PM Jan Dhan Plan | खात्यात कॅश नसली तरी काढता येईल 10 हजार, जनधन योजनेतंर्गत इतर सुविधाही मिळतात

| Updated on: Sep 04, 2022 | 7:10 PM

PM Jan Dhan Plan | पंतप्रधान जनधन योजनेच्या खात्यात रक्कम नसली तरी तुम्हाला 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच इतरही अनेक सुविधा मिळतात. यासंबंधीची माहिती जाणून घेऊयात..

PM Jan Dhan Plan | खात्यात कॅश नसली तरी काढता येईल 10 हजार, जनधन योजनेतंर्गत इतर सुविधाही मिळतात
जनधन योजनेची वैशिष्ट्ये
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

PM Jan Dhan Plan | पंतप्रधान जनधन योजनेच्या (PM Jan Dhan Yojana) खात्यात रक्कम नसली तरी तुम्हाला 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट (Overdraft) ची सुविधा देण्यात आली आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनधन योजनेची घोषणा केली होती. त्यावर्षी 28 ऑगस्ट रोजी ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत पीएम जनधन खात्यांची एकूण संख्या 42 कोटींच्या पुढे गेली आहे. या योजनेचे यश पाहून केंद्र सरकारने (Central Government) 2018 मध्ये अधिक सुविधा आणि लाभांसह ही योजना पुन्हा नव्याने सादर केली. यासंबंधीची माहिती जाणून घेऊयात..

शिल्लकची गरज नाही

2015 पासून पंतप्रधान जनधन योजनेतंर्गत झीरो बॅलन्स खाते काढता येते. पण या योजनेत अनेक खातेदारांनी बचत सुरु करायला सुरुवात केली. त्यामुळे खाते झीरो बॅलन्स असले तरी त्यात बरीच शिल्लक होती.

Zero नव्हे Hero

मार्च 2015 मध्ये मध्ये 58 टक्के खात्यात शिल्लक नव्हती. पण हा ट्रेंड कमी कमी होत गेला. आता झिरो बॅलन्स असलेली खाती केवळ 7 टक्के उरली आहेत.

हे सुद्धा वाचा

या सुविधा माहिती आहेत का?

योजनेतंर्गत 10 वर्षाखालील मुलालाही खाते उघडता येते
रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचा आयुर्विमा आणि ठेवींवरील व्याज मिळते.
10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते.
पीएम जनधन खाते कोणत्याही बँकेत उघडता येते.
खात्यात शिल्लकी ठेवण्याची गरज नाही. बॅलन्स नसले तरी खाते अॅक्टीव्ह राहते.

कोणती कागदपत्रे गरजेची

खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.
यापैकी एकही पुराव नसला तरी खाते उघडता येते.
बॅक अधिकाऱ्यासमोर सेल्फ अटेस्टेड फोटो आणि स्वाक्षरी करुन खाते उघडता येते.
खाते उघडण्यासाठी कुठलेही शुल्क नाही.

खात्यांची संख्या 42 कोटींच्या पुढे

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केली होती. त्यावर्षी 28 ऑगस्ट रोजी ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत पीएम जनधन खात्यांची एकूण संख्या 42 कोटींच्या पुढे गेली आहे.

कोणालाही उघडता येते खाते

या योजनेचे यश पाहून केंद्र सरकारने (Central Government) 2018 मध्ये अधिक सुविधा आणि लाभांसह ही योजना पुन्हा नव्याने सादर केली. या योजनेत कोणताही भारतीय नागरीक खाते उघडू शकतो.