नवी दिल्ली: यंदा दिवाळीपूर्वीच सोन्याला नवी झळाळी मिळाल्याचे दिसत आहे. सोन्याचे दागिने आणि नाण्यांची विक्री कोविडपूर्व पातळीपर्यंत पोहोचली. दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आल्याने ग्राहकांची गर्दी सोने खरेदीसाठी दुकानांकडे वळली. धनत्रयोदशीला देशभरात सुमारे 75000 कोटी रुपयांची विक्री झाली. सुमारे 15 टन सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली.
सोन्याची नाणी आणि इतर लहानसहान वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली आहे. यामध्ये ऑनलाईन खरेदीचाही लक्षणीय वाटा आहे. हिंदू मान्यतेनुसार धनत्रयोदशी हा मौल्यवान धातू ते भांडी खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटले आहे की ज्वेलरी उद्योग साथीच्या रोगामुळे आलेल्या मंदीतून सावरला आहे. सीएआयटीने सांगितले की यामध्ये दिल्लीत सुमारे 1,000 कोटी रुपये, महाराष्ट्रात सुमारे 1,500 कोटी रुपये, उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 600 कोटी रुपयांच्या विक्रीचा समावेश आहे. दक्षिण भारतात, विक्री अंदाजे 2,000 कोटी रुपये आहे.
सोन्याच्या पेढ्यांवर ग्राहकांची वाढती गर्दी दिसून आली, जे ऑफलाइन खरेदी पूर्वपदावर आल्याचे द्योतक आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत दुकानात जाणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) चे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत) सोमसुंदरम पीआर म्हणाले, “दडपलेली मागणी, किंमतीत घट आणि चांगला मान्सून तसेच लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शिथिलता यामुळे मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले, ही तिमाही अलिकडच्या वर्षांतील सर्वोत्तम तिमाही असेल अशी आमची अपेक्षा आहे.
दिल्लीस्थित कंपनी पीसी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक बलराम गर्ग यांनी सांगितले की, या धनत्रयोदशीच्या काळात मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली असते. ते म्हणाले, आतापर्यंत आमच्या शोरूममध्ये लोकांची गर्दी चांगली होती. ग्राहक हलक्या वजनाच्या दागिन्यांची खरेदी करत आहेत.
कोलकातास्थित कंपनी नेमीचंद बमलवा अँड सन्सचे सह-संस्थापक बच्छराज बमलवा यांनीही सांगितले की, साथीच्या आजारामुळे ग्राहकांनी गेल्या दोन वर्षांत खरेदी केली नाही. आता परिस्थिती सामान्य झाल्यामुळे लोक बाहेर पडत आहेत आणि खरेदी करत आहेत.
संबंधित बातम्या
धनत्रयोदशीला सोन्याचे भाव वाढले, चांदीही महागली, पटापट तपासा नवे दर
कोटक सिक्युरिटीजचं छोट्या गुंतवणूकदारांना गिफ्ट, आता मोफत व्यवहार करता येणार