मुंबईः देशातील अनेक मोबाईलधारक 5G (5G Service) ची आतुरतेने वाट बघत आहेत. आपल्याला 5G सेवा तात्काळ मिळावी, त्याचा आपल्याला फायदा व्हावा यासाठी लागणाऱ्या उपकरणांचीही (Device) खूप वेगाने विक्री केली जात आहे. यासाठी लागणाऱ्या उपकरणांची संख्या तुम्ही ऐकाल तर थक्क होऊन जाल. 5G सेवेसाठी 1 कोटींहून अधिक 5G उपकरणे खरेदी केली गेली आहेत, मात्र या कशाचीही पर्वा या सरकारला (Government) नाही. ज्यांनी ही उपकरणे खरेदी केली आहेत, ते आता चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काही जणांचे मत आहे लाँचिग बाजूला ठेऊन 5G सेवा तात्काळ सुरु करा. ही अशी मागणी करण्यात आली असली तरी अजूनपर्यंत 5G साठी स्पेक्ट्रमचा लिलावदेखील झालेला नाही. याचा अर्थ असा होतो की, या उपकरणासाठी अनेक जण पैसा खर्च करत आहेत, मात्र त्याचा वापर कधी होणार याबाबत अजून कोणतेच संकेत देण्यात आले नाहीत.
यासाठी होणाऱ्या लिलावाची गोष्टही खूप लांबची गोष्ट आहे, त्यातच अजूनपर्यंत स्पेक्ट्रमची राखीव किंमतहा ठरलेली नाही. मात्र काही लोकं 5G ची उपकरणे लवकर खरेदी करत आहेत. ही उपकरणे यासाठी खरेदी करण्यात येत आहेत की, 5G चे इंटरनेट खूप गतीने आपल्याला वापरता येणार आहे, आणि त्याचा आनंद घेता येणार आहे. टेलीकॉम ऑपरेटर्सही या 5G सेवा कधी एकदा लाँच होते त्याची वाट बघत आहेत. आणि त्यासाठी ते मोठ्या संख्येने सदस्य जोडत आहेत. 5G सेवच्या आगमनाने सर्वच क्षेत्रात प्रचंड मोठा बदल होणार आहे. सरकारी सेवांपासून ते अगदी खासगी कंपन्या, आरोग्यसेवांसाठी मोठ्या प्रमाणावर यामध्ये संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र सरकारच्या वेळखाऊ धोरणामुळे आता ही अपेक्षा आता निरर्थक ठरणार आहे. त्यामुळे ज्यांना या सेवेबद्दल माहिती नाही असे लोक लोक 5G स्मार्टफोन आणि त्यासाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्यात व्यस्त आहेत. तर असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, 2022 मध्ये 5G स्मार्टफोनची विक्री एकूण स्मार्टफोन विक्रीच्या 40 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
मोबाईल तंत्रज्ञानामधील 5G हे तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल सेवेतील पाचवा टप्पा आहे. मोबाईलधारकांना नेटवर्कमध्ये वेग मिळावा आणि त्याद्वारे त्यांना फायदा व्हावा यासाठी हे विकसित केलेल तंत्रज्ञान आहे. . 4G च्या तुलनेत 5G मध्ये डेटा ट्रान्सफरचा वेग प्रचंड असणार आहे. त्यामुळे अपलोड करताना कोणतीही गोष्ट सहज अपलोड होणार आहे. त्यामुळे 5G सर्व्हिस एकदा चालू झाली की, कोणतेही Application तुम्हाला सहज हाताळता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळ आणि पैसाही कमी खर्च होणार आहे.
संबंधित बातम्या
West Bengal Crime: पश्चिम बंगालमध्ये तस्करांच्या मनसुब्यावर पाणी, 40 सोन्याची बिस्कीटं जप्त
Sharad Pawar NCP Meet : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक, सिल्वर ओकवर आगामी रणनीती ठरणार