नवी दिल्ली: जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आता फक्त एक नंबर डायल करून त्याचे निराकरण केले जाऊ शकते. आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित अनेक समस्या आहेत, ज्यासाठी तुम्ही आता 1947 नंबर डायल करू शकता आणि तुमच्या सर्व समस्या दूर करू शकता. UIDAI ने ट्विट करून या क्रमांकाची माहिती दिली आहे. 12 प्रादेशिक भाषांमध्ये ही हेल्पलाईन उपलब्ध असेल.
आधार हेल्पलाइन 1947 हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू या 12 भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. #Dial1947ForAadhaar वर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत संवाद साधू शकता. हा क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे.
हा 1947 क्रमांक विनामूल्य आहे जो वर्षभर IVRS मोडवर चोवीस तास उपलब्ध असतो. तसेच या सुविधेसाठी कॉल सेंटरचे प्रतिनिधी सकाळी 7 ते रात्री 11 (सोमवार ते शनिवार) उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रतिनिधी उपलब्ध असतात.
1. नवीन आधार PVC कार्डसाठी, तुम्हाला UIDAI वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. ‘माय आधार’ विभागात जा आणि ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ वर क्लिक करा.
3. यानंतर, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी आयडी (EID) टाकावा लागेल.
4. आता तुम्ही सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा भरा आणि OTP साठी Send OTP वर क्लिक करा.
5. यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाका.
6. आता तुमच्याकडे आधार पीव्हीसी कार्डचा Preview दाखवला जाईल.
7. यानंतर तुम्ही खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
8. यानंतर तुम्ही पेमेंट पेजवर जाल, येथे तुम्हाला 50 रुपये शुल्क जमा करावे लागेल.
9. पेमेंट पूर्ण केल्यानंतर, तुमच्या आधार PVC कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल.
संबंधित बातम्या:
Masked Aadhar Card | मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय? किती आहे सुरक्षित आणि कुठे होतो वापर?
तुमचं आधार कार्ड बनावट आहे का? एका मिनिटात तपासून पाहा
व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही