शासकीय महत्वाचे दस्ताऐवज नेहमी अपडेट हवे असतात. त्यासाठी शासनाकडून विविध सवलती दिल्या जातात. आता प्रत्येक कामासाठी आवश्यक असणारे आधारसंदर्भात शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा मोफत आहे. परंतु त्यासाठी डेडलाइन दिली आहे. ती डेडलाइन येत्या सहा दिवसांत संपणार आहे. आता फक्त 14 सप्टेंबरपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार आहे. त्यानंतर त्यासाठी पैसे लागण्याची शक्यता आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI कडून 10 वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली गेली आहे. 14 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. यापूर्वी आधार अपडेट करण्याची डेडलाइन अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा डेडलाइन वाढवण्याची शक्यता नाही. यामुळे आता तुम्ही आधार अपडेट केले नाही तर त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 10 वर्षांपेक्षा जास्त जुने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा अनेक वेळा वाढवली आहे. यापूर्वी मोफत अपडेट करण्याची तारीख 14 मार्च होती. त्यानंतर ही तारीख वाढवून 14 जून 2024 करण्यात आली. पुन्हा तीन महिन्यांसाठी तारीख वाढवून 14 सप्टेंबर करण्यात आली आहे. ही डेडलाइन संपल्यानंतर शुल्क द्यावे लागणार आहे. 50 रुपये देऊन आधार अपडेट करता येणार आहे. मोफत सेवा केवळ myAadhaar Portal वर उपलब्ध आहे.