मुंबई : जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. त्यांची किंमत आणि फायदेदेखील वेगवेगळे आहेत. सर्व टेलिकॉम कंपन्या छोट्या किंमतीपासून 3000 रुपयांपर्यंत रिचार्ज प्लॅन देतात. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात डिस्ने प्लस हॉटस्टारचे एक वर्षाची मेम्बर्शीप विनामूल्य उपलब्ध केली आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 500 रुपयांनी कमी आहे. चला तर या रिचार्ज प्लॅनबद्दल एक-एक मुद्दा विचारात घेऊन अधिक माहिती जाणून घेऊया. जेणेकरून तुम्ही तुमच्या सोयीचा रिचार्ज प्लॅन निवडू शकाल. (Access to these apps on Jio, Airtel and Vi’s Rs 500 recharge plan)
डिझनी प्लस हॉट स्टारचे सध्या दोन प्लॅन आहेत. त्यापैकी एक सुपर आणि दुसरा प्रीमियम आहे. सुपर प्लॅनची किंमत वार्षिक 899 रुपये आहे, तर प्रीमियम प्लॅनची किंमत वार्षिक 1499 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनअंतर्गत डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध 499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे सदस्यत्व मिळते. तसेच या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे आणि युजर्सना 6 जीबी अतिरिक्त डेटासह दररोज 3 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनअंतर्गत युजर्सना एकूण 90 जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्रीपेड प्लॅनमध्ये जिओ टीव्हीसह कॉम्प्लिमेंटरी अॅप्सचा अॅक्सेस मिळणार आहे.
रिलायन्स जिओप्रमाणे एअरटेलदेखील 499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचे एक वर्षाचे सदस्यत्व देत आहे. या रिचार्ज प्लॅनअंतर्गत युजर्सना 28 दिवसांची वैधता मिळेल. तसेच यात दररोज 3 जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. यादरम्यान युजर्सना अमर्यादित कॉलदेखील मिळतील. यासह 499 रुपये किमतीची डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सदस्यतादेखील उपलब्ध असेल. तसेच एअरटेलच्या कॉम्प्लिमेंटरी ऍप्समध्ये ऍक्सेस मिळेल.
रिलायन्स जिओ आणि एअरटेलप्रमाणे Vi देखील डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. याची किंमत 501 रुपये आहे. या प्लॅनअंतर्गत युजर्सना 28 दिवसांची वैधता व या मुदतीत अमर्यादित कॉल्स करता येतील. युजर्सना दररोज 3 डीबी डेटा मिळेल. यात वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा असून युजर्सना दररोज एकूण 100 एसएमएस मिळतील. (Access to these apps on Jio, Airtel and Vi’s Rs 500 recharge plan)
Gold-Silver Weekly Updates : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोन्याने केला 48 हजाराचा टप्पा पारhttps://t.co/5Nnf7FBUXZ#Gold |#Silver |#WeeklyUpdate |#Rate |#Hike
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
इतर बातम्या
रिअल इस्टेटला सुगीचे दिवस! स्टॅम्प ड्युटी सवलतींमुळे मालमत्तांचे रजिस्ट्रेशन दुप्पटीने वाढले
गृह कर्जावर घेतलेले घर विकत असाल तर कराचा भार पेलावा लागेल; जाणून घ्या यावर उपाय