एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या वाहनांचा (Vehicle) वापर करतो. कोणाला बसने तर कोणाला कारने प्रवास करायला आवडते. पण अनेक वेळा लांब पल्ल्याच्या किंवा आरामात प्रवास करण्याच्या इच्छेमुळे नागरिक घरातील चारचाकी न काढता त्याऐवजी आणखी काही पर्याय शोधतात. अशा परिस्थितीत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे (Railway) सर्वात योग्य मानली जाते.रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध आहेत. आरामदायी आसनव्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि टॉयलेटची सुविधाही ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हालाही ट्रेनने प्रवास (Train Travel) करायचा असेल, तर तुम्हाला सहसा आगाऊ तिकीट बुक करावं लागतं, कारण लगेच तिकीट मिळणं जवळपास कठीण होऊन बसतं.अशा परिस्थितीत ज्यांना काही महत्त्वाच्या कामानिमित्त अचानक रेल्वेने प्रवास करावा लागतो, पण तिकीट कन्फर्म (Confirm Ticket) नसल्याने अशा वेळी प्रवास करता येत नाही. पण रेल्वेचा एक नियम आहे, ज्यानुसार तुम्ही रेल्वेतून आरक्षणाचं तिकीट न काढताही प्रवास करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे असेल ते…
अनेक जणांना विशिष्ट कारणासाठी किंवा एखादे काम अचानक आल्यावर रेल्वेने प्रवास करावा लागतो, त्यामुळे तिकीट बुक करून ते कन्फर्म करण्यासाठी त्यांची धांदल उडते. पण कन्फर्म तिकिटांअभावी त्यांना तसे करता येत नाही. त्याचबरोबर तत्काळ तिकिटाचा पर्यायही असतो, पण तिकीटांची संख्या कमी आणि मागणी जास्त असल्याने ते मिळणेही जवळपास दुरापास्त होते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा प्रवास प्लॅटफॉर्म तिकीटाच्या माध्यमातून करू शकता.
जर तुम्हाला अचानक रेल्वेने प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे रिझर्वेशन तिकीट नसेल तर अशा परिस्थितीत आधी प्लॅटफॉर्म तिकीट विकत घेऊन ते घेऊन ट्रेनमध्ये चढावं लागतं. यानंतर तुम्हाला तिकीट तपासणीसाला गाठावं लागेल आणि तुमच्या प्रवासाची माहिती देत कुठे सीट उपलब्ध होऊ शकेल याची चाचपणी करावी लागेल. तुम्ही तिकीट तपासणीसाला तुमच्या गंतव्यस्थानाबद्दल सांगता, तेव्हा तो तुम्हाला तिकीट देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही आरामात प्रवास करू शकाल.
ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसेल, असा विचार करत असाल तर प्रवास कसा करणार? त्यामुळे एक खूनगाठ मनाशी पक्की करा की, आरक्षणाची जागा नसतानाही तिकीट तपासणीस तुम्हाला प्रवासाची परवानगी देईल. यासंदर्भातील नियमानुसार तिकीट तपासणीस तुमच्याकडून भाड्याच्या संपूर्ण पैशांसह 250 रुपये दंड आकारेल आणि मग तुम्ही आरामात प्रवास करू शकाल.
तुम्हाला कधी अचानक प्रवास करावा लागला तर तुम्ही रेल्वे काऊंटरवरून प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करू शकता. वेगवेगळ्या रेल्वे झोननुसार यासाठी 10 ते 50 रुपयांपर्यंत द्यावे लागतात.
हेही वाचा:
VIDEO: गहना वशिष्ठचा एकता कपूरवर गंभीर आरोप, “तिच्यामुळे मी आत्महत्येचा विचार..”