एअरटेल पेमेंट्स(Airtel Payments Bank) बँकेने मंगळवार, 26 एप्रिलपासून ग्राहकांसाठी मुदत ठेव (Fixed Deposit) सुविधा सुरू केली आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेने ग्राहकांसाठी एफडी (FD) सेवा सुरू करण्यासाठी इंडसइंड बँकेसोबत (Indusind Bank) भागीदारी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एअरटेल पेमेंट बँकेत मुदत ठेव खाते उघडणाऱ्या ग्राहकांना 6.5 ते 7 टक्के व्याज मिळेल. एवढेच नव्हे तर एअरटेल पेमेंट्स बँकेत एफडी उघडणाऱ्या ग्राहकांना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी (Maturity) पैसे काढल्याबद्दल कोणताही दंड भरावा लागणार नाही. अर्थात एअरटेल पेमेंट्स बँकेची ही ऑफर त्यांच्या ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. एफडी (FD) सेवा सुरू झाल्यानंतर एअरटेल पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.एअरटेल पेमेंट्स बँक ग्राहकांना 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांसाठी मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवणूक करु शकता. इतकंच नाही तर ग्राहक एकावेळी एकापेक्षा जास्त मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करु शकता.
एअरटेल पेमेंट्स बँकेत एअरटेल थँक्स अॅपच्या (Airtel Thank App) माध्यमातून 500 ते 1 लाख 90 हजार रुपयांची एफडी करता येईल, त्यावर 6.5 टक्के व्याज मिळेल, असे इंडसइंड बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना सर्व एफडीवर 0.5 टक्के अधिक म्हणजे टक्के व्याज दिले जाणार आहे.
एखाद्या ग्राहकाला मॅच्युरिटीपूर्वी एफडी तोडायची असेल तर त्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही आणि गुंतवलेले सर्व पैसे काही मिनिटांत तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर होतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. इंडसइंड बँकेने सांगितले की, एअरटेल पेमेंट्स बँक ग्राहकांना 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांसाठी मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवणूक करु शकता. इतकंच नाही तर ग्राहक एकावेळी एकापेक्षा जास्त मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करु शकता.
एअरटेल पेमेंट बँक ही एअरटेल कम्युनिकेशन्स या देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल कम्युनिकेशन्सने 2017 मध्ये एअरटेल पेमेंट्स बँक सुरू केली. विकिपीडियानुसार, एअरटेल पेमेंट्स बँकेत एअरटेलची 80.01 टक्के आणि कोट महिंद्रा बँकेची 9.99 टक्के भागीदारी आहे.
इतर बातम्या :