तुम्हीही तुमचे स्वयंपाकघर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर हिच ती वेळ आहे… सध्या अमॅझोनचा (Amazon) समर सेल सुरु आहे. यात, तुम्ही किचनमध्ये दैनंदिन लागणार्या विविध वस्तू सवलतीच्या (discount) दरात खरेदी करु शकणार आहात. सेलमध्ये सर्वच वस्तूंवर आकर्षक सुट देण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक किचन अप्लायन्सेसचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांची किंमत 10 हजार रुपयांच्या आत आहे. तुम्ही या सेलमध्ये 6.2 लिटर साठवण क्षमता (Storage capacity) असलेले वॉटर प्युरिफायर केवळ 9,499 रुपयांना खरेदी करू शकता. हे वॉटर प्युरिफायर 200ppm पर्यंत डीडीएसला सपोर्ट करते. हे भिंतीवर आणि टेबलटॉपवरदेखील ठेवता येते, यासह विविध वस्तूंवर आकर्षक सुट देण्यात आलेली आहे, याची या लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.
हा ज्यूसर केवळ 8,849 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. यात अॅल्युमिनियम डिझाइन देण्यात आलेली आहे.
त्याच्या कोर्डची लांबी 1 मीटर असून ती केवळ एका मिनिटात स्वच्छ करता येते. ज्युसरमध्ये इंटिग्रेटेड कोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे.
अमॅझोनच्या सेलमध्ये Kent Atta and Bread Maker 6,998 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
हे पूर्णपणे स्वयंचलित असून त्यात 19 प्रीसेट मेनू आहेत. या डिव्हाईसमध्ये वन टच ऑपरेशन देण्यात आले असून ते डिटेचेबल घटकासह येते.
हा 800W कॉफी मेकर एका वेळी 4 कप कॉफी बनवू शकतो. सेल दरम्यान तुम्ही याला 4,499 रुपयांना खरेदी करू शकता. कॉफी स्ट्रेंथ सिलेक्टर, काढता येण्याजोगा ड्रिप ट्रे, स्टेनलेस स्टील 2 कप फिल्टर यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
बॉश प्रो 750W मिक्सर ग्राइंडर विथ 3 जार 5,440 रुपयांना विकले जात आहे. यात हाय फ्लक्स मोटर आणि स्टोन पाउंडिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हे हँड्स फ्री देखील ऑपरेट करता येते.