मुंबई : सोमवार ते शुक्रवार या दरम्यान बँकेची महत्वाची कामे करण्यास आपण प्राधान्य देतो. यंदा नवे वर्ष सुट्यांशी गट्टी घेऊनच आले आहे. शनिवार आणि रविवारचा निवांतपणा घेऊन आलेल्या नवीन वर्षात बँकांना कोणत्या दिवशी आणि किती सुट्या आहेत ते पण बघून घ्या. नाहीतर कामकाज नसलेल्या दिवशी तुम्ही तुमचे काम काढून बँकेत जाल आणि बंद बँकेसमोरुन तुम्हाला परत फिरावे लागेल. 2022 मध्ये बँकेला कोणत्या दिवशी सुट्टी आहे ते बघुयात
दर महिन्याला बँकांना कोणत्या दिवशी सुट्टी असेल याची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जाहिर करते. बँकांच्या सुट्ट्यांमध्ये केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाने घोषीत केलेल्या सुट्यांचा समावेश असतो. देशात तीन राष्ट्रीय सुट्ट्या दिल्या जातात. प्रजासत्ताक दिवस-26 जानेवारी, स्वतंत्रता दिवस-15 ऑगस्ट आणि महात्मा गांधी जयंतीचा – 2 ऑक्टोबर यांचा यामध्ये समावेश आहे.
आणि चौथा शनिवार (Fourth Saturday) या दिवशी देशातील बँका बंद असतात. या दिवशी बँकाचे कामकाज पुर्णतः बंद असते. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात 8 जानेवारी रोजी दुसरा शनिवार आणि 22 जानेवारी रोजी चौथा शनिवार येत आहे. त्यामुळे या दिवशी बँका बंद असतील. तर हक्काची रविवारची सुट्टी आहेच. यादिवशी बँका बंद असतात. जानेवारी महिन्यात 5 रविवार येत आहेत आणि या दिवशी कामकाज बंद असेल. 2 जानेवारी, 9 जानेवारी, 16, 23 आणि 30 जानेवारी रोजी रविवार येत असल्यामुळे बँकांचे कामकाज होणार नाही. म्हणजे जानेवारी महिन्यांत मोजून शनिवारसह रविवार मिळून एक आठवडा बँका बंद असतील.
जानेवारीः
1 जानेवारीः नवीन वर्षाचा दिवस
14 जानेवारीः मकर संक्रांत/पोंगल
15 जानेवारीः उत्तरायण, मकर संक्रांती, माघ बिहू
26 जानेवारीः गणतंत्र दिवस
फेब्रुवारीः
5 फेब्रुवारीः वसंत पंचमी
मार्चः
1 मार्चः महाशिवारात्री
18 मार्चः होळी
एप्रिलः
10 एप्रिलः रामनवमी
13 एप्रिलः उगादी(तेलगू नवीन वर्ष)
14 एप्रिलः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, बैसाखी, बीजू महोत्सव, बोहाग बिहू
15 एप्रिलः गुड फ्रायडे, बंगाली नवीन वर्ष, बोहाग बिहू
मेः
2 मेः रमजान ईद (ईद-उल-फितर)
3 मे ः भगवान परशुराम जयंती/ रमजान ईद/बसवा जयंती /अक्षय तृतीया
9 मेः रवींद्रनाथ टॅगोर जन्मदिवस
16 मेः बुद्ध पौर्णिमा
जूनः
2 जूनः महाराणा प्रताप जयंती
14 जूनः संत गुरु कबीर जयंती
15 जूनः गुरु हरगोविंदजी जन्मदिवस
जुलैः
10 जुलैः बकरी ईद
ऑगस्टः
9 ऑगस्टः मोहर्रम
12 ऑगस्टः रक्षा बंधन
15 ऑगस्टः स्वतंत्रता दिवस
16 ऑगस्टः पारशी नवे वर्ष
19 ऑगस्टः जन्माष्टमी
31 ऑगस्टः गणेश चतुर्थी
सप्टेंबरः
8 सप्टेंबरः तिरुवोना
ऑक्टोबरः
2 ऑक्टोबरः महात्मा गांधी जयंती
3 ऑक्टोबर ः महाअष्टमी
4 ऑक्टोबरः महा नवमी
5 ऑक्टोबरः विजया दशमी
9 ऑक्टोबरः ईद ए मिलाद
24 ऑक्टोबरः दिवाळी
नोव्हेंबर
8 नोव्हेंबरः गुुरु नानक जयंती
डिसेंबरः
25 डिसेंबरः ख्रिसमस नाताळ
इतर बातम्या :