मुंबई : जानेवारीप्रमाणे फेब्रुवारीमध्ये बँकांना शनिवार, रविवार सह इतर दिवशी बॅंकांना (Bank Holiday) सुट्टी राहील. फेब्रुवारीमध्ये बँकेशी संबंधित आवश्यक काम असेल तर त्याचे आधीच नियोजन करावे लागेल, नाहीतर तर तुमची कामं कोळंबीला. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँक सुट्यांची यादी जाहीर करते.या सुट्यांची राज्यांद्वारे ठरवल्या जातात तर राष्ट्रीय सुट्या वेगळ्या असतात. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार, रविवारच्या सुट्या आहेत. फेब्रुवारीमध्ये एकूण 6 सुट्या पडत आहेत. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारच्या सुट्टीचा समावेश आहे. लक्षात घ्या की काही सुट्या राष्ट्रीय स्तरावर आणि काही राज्यांच्या पातळीवर निश्चित केलेल्या आहेत.दोन शनिवार, चार रविवार सोडून बॅंका 6 दिवस आणखी बंद राहतील. या दरम्यान ऑफलाईन व्यवहार बंद असले तरी ग्राहकाला ऑनलाईन व्यवहार करता येईल.
बँकेच्या सुट्ट्या म्हणजे शटर डाऊन, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंक शाखेत त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाइन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. तसेच हे लक्षात ठेवा की काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील.
12 फेब्रुवारी 2022 आणि 26 फेब्रुवारी 2022 रोजी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. त्याचप्रमाणे 6, 13, 20 आणि 27 फेब्रुवारी रोजी रविवारी बँका बंद राहतील. आजकाल देशातील सर्व बँका एकाच वेळी काम करणे थांबवतात.
आधी बँकांच्या कामाचा करा निपटारा
जर बँकेतील काम प्रलंबित असतील, तर या सुट्यांअगोदर ही कामे लवकर पूर्ण करा. नाहीतर तुमची कामे खोळंबून पडतील. येत्या आठवड्यात तुमच्या बँक शाखेतून पैसे काढायचे असतील किंवा जमा करायचे असतील तर बँकेची ही कामे फेब्रुवारी महिन्यातील सुट्यांची यादी बघून वेळेआधीच पूर्ण करा.
या दिवशी शटर डाऊन
फेब्रुवारी 2, 2022 : गंगटोकमधील सोनम लोचरच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहतील.
फेब्रुवारी 5, 2022 : अगरतळा, भुवनेश्वर आणि कोलकाता येथील सरस्वती पूजा (श्री पंचमी)/बसंत पंचमीमुळे बँका बंद राहतील.
फेब्रुवारी 15, 2022 : मोहम्मद हजरत अली/लुई-नागाई-नी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इम्फाळ, कानपूर आणि लखनऊ येथे बँका बंद राहतील.
फेब्रुवारी 16, 2022 : चंडीगडमध्ये गुरू रवी दासजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
फेब्रुवारी 18, 2022 : कोलकात्यात डोलजात्राच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
फेब्रुवारी 19, 2022 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बेलापूर, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद राहतील.
आजकाल देशातील सर्व बँका एकाच वेळी काम करणे थांबवतात. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व बँका बंद राहतील. 26 जानेवारी रोजी अगरतला, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, गुवाहाटी, इम्फाळ, जयपूर, कोची आणि श्रीनगर येथे बँका कार्यरत राहतील.