मुंबई : जर तुम्हालाही महागडं घर, दुकान किंवा जमीन स्वस्तात खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सरकारी बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) कोणत्याही ब्रोकरेजशिवाय स्वस्तात घर, जमीन, दुकान खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. BoB अर्थात बँक ऑफ बडोदाने आज मेग ई-लिलाव (BoB Mega E-Auction) आयोजित केला आहे. यामध्ये रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचा समावेश आहे.
बँक ऑफ बडोदाने ट्विट करुन ही माहिती दिली. ” दिनांक 08.09.2021 रोजी बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे, तुमच्या आवडीची प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी. कोणत्याही ब्रोकरेजशिवाय, पूर्ण पारदर्शकपणे ई-लिलावाचा आनंद लुटा. संपूर्ण देशात लिलाव होणार आहे, तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर पाहू शकता” असं बँकेने म्हटलं आहे.
08.09.2021 को बैंक ऑफ बड़ौदा ला रहा है आपके लिए एक सुनहरा मौका अपनी पसंद की प्रॉपर्टी खरीदने का। बिना किसी ब्रोकरेज के, पूर्ण पारदर्शिता के साथ इस मेगा ई-ऑक्शन का आनंद लें। अधिक जानकारी के लिए https://t.co/ejge3HE0ms #BankofBaroda #megaeauction pic.twitter.com/fWkvnt6sIr
— Bank of Baroda (@bankofbaroda) September 7, 2021
बँकेने नेमकी कुठल्या प्रॉपर्टीसाठी लिलाव आणला आहे, याची सविस्तर माहिती दिली आहे. बँकेच्या वेबसाईटवर त्याचा पूर्ण तपशील आहे. वेबसाईटवर जाऊन तुम्ही या लिलावात सहभागी होऊ शकता.
ई लिलावात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित प्रॉपर्टीची अनामत रक्कम जमा करावी लागेल. संबंधित बँक शाखेत ‘KYC डॉक्युमेंट्स’ दाखवावे लागतील.
लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे डिजीटल सिग्नेचर आवश्यक आहे. तुम्हाला ई लिलावामध्ये अन्य अधिकृत एजन्सीद्वारेही सहभागी होता येईल.
संबंधित बँक शाखेत रक्कम जमा करुन, तुमची कागदपत्र दाखवल्यानंतर, तुमच्या अधिकृत ई मेल आयडीवर लॉग इन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. नियमावली पाळून तुम्ही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकता.
संबंधित बातम्या