नवी दिल्ली: भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रिटेल कर्ज स्वस्त झाले आहे. ही ऑफर होम लोन आणि कार लोन उत्पादनांसाठी लागू असेल. BOB ने गृह आणि कार कर्जाच्या सध्याच्या व्याजदरांवर 0.25 टक्के सूट दिली आहे. याशिवाय बँक गृहकर्जामध्ये प्रक्रिया शुल्काची माफीही देत आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (SBI-State Bank of India) ने गुरुवारी आपल्या अनेक सेवांसाठीचे शुल्क रद्द करत असल्याची घोषणा केली होती.
व्याजदरात कपात केल्यानंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये गृहकर्जाचे दर 6.75 टक्के आणि कार कर्जाचे दर 7 टक्क्यांपासून सुरू होतील. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, कर्जाच्या झटपट मंजुरीसाठी ग्राहक बँकेच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवरुन कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच डोअर स्टेप सेवाही उपलब्ध आहे.
This festive season, karo #KhushiyonKaShreeGanesh as #BankofBaroda is offering a concession of 0.25% on the existing Rate of Interest. Get #HomeLoan at 6.75%* & #CarLoan at 7.00%* .
Offer valid till 31 Dec, 2021. Avail today! *T&C pic.twitter.com/XYC2jjkIBI— Bank of Baroda (@bankofbaroda) September 16, 2021
सणासुदीच्या काळात घर खरेदीदारांना सुलभ कर्ज देण्यासाठी एसबीआयने क्रेडिट स्कोर लिंक्ड होम लोनची योजना आणली आहे. यामध्ये, ग्राहकांना कर्जाच्या रकमेवर कोणतीही मर्यादा न ठेवता केवळ 6.70 टक्के वार्षिक व्याज दराने गृहकर्ज मिळेल. एसबीआयने गृहकर्जासाठी प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले आहे.
भारतीय स्टेट बँकेने आता आपल्या ग्राहकांना आणखी एक नवी सुविधा देऊ केली आहे. या सुविधेमुळे आता ग्राहकांना बँकेत झीरो बॅलन्स खाते उघडणे आणखी सोपे झाले आहे. एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खाते (बीएसबीडीए) कोणत्याही व्यक्तीद्वारे वैध केवायसी देऊन उघडता येते. या बँक खात्यात आवश्यक किमान शिल्लक शून्य आहे आणि या खात्यात जास्तीत जास्त रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
एसबीआयच्या BSBD खात्याअंतर्गत खातेधारकांना इतर बचत खात्यांपेक्षा अधिकच्या सुविधा मिळतील. या खात्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी किमान किंवा कमाल शिल्लक ठेवण्याची गरज नाही. स्टेट बँकेच्या इतर बचत खात्यांवर उपलब्ध असलेले व्याज या खात्यावर दरवर्षी दिले जाते. हे खाते उघडण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे ग्राहकाचे इतर कोणतेही बचत खाते नसावे, जर बचत किंवा मूलभूत बचत खाते असेल तर ग्राहकाला ते 4 आठवड्यांच्या आत बंद करावे लागेल.
संबंधित बातम्या:
डेबिट कार्डावरची रक्कम EMI मध्ये कशी कन्व्हर्ट कराल?
SBI चं कोट्यवधी ग्राहकांना गिफ्ट; सर्व शुल्क रद्द, प्रत्येक महिन्याला अधिक लाभ मिळणार
रेशन कार्डवरील मोबाईल क्रमांक बदलायचाय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया