या बँकेत महिन्याला फक्त 28 रुपये भरून मिळवा चार लाखांचा फायदा

| Updated on: Oct 04, 2021 | 7:53 AM

Insurance | 4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत.

या बँकेत महिन्याला फक्त 28 रुपये भरून मिळवा चार लाखांचा फायदा
पैसे कमवा
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे लोक कधी नव्हे एवढे आरोग्याविषयी सजग झाले आहेत. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स (Insurance), मेडिक्लेम आणि इतर आरोग्यविषयक उत्पादने आणि सेवांची मागणी वाढली आहे. सध्याचा बिकट काळ पाहता अनेकजण आरोग्य विमा उतरवून घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. मात्र, विमा उतरवून घेणे ही प्रत्येकालाच परवडणारी गोष्ट नाही.

अशा लोकांसाठी बँक ऑफ बडोदाची एक योजना सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये एकदाच माफक प्रीमियम भरून तुम्हाला विमा मिळतो. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना एक खास ऑफर दिली आहे. यामध्ये तुम्ही महिन्याला फक्त 28 रुपये भरून चार लाख रुपयांचा विमा मिळेल.

4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूकीची रक्कम खूप कमी आहे. या दोन योजनांमध्ये, फक्त 342 रुपये वार्षिक जमा करावे लागतात म्हणजेच फक्त 28 रुपये दरमहा.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत 2 लाखांचा कव्हर

PMSBY अवघ्या 12 रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाखांचा कव्हर मिळतो. विमा घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये मिळतात.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा फायदा काय?

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना PMSBY योजना अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा प्रदान करते. पीएमएसबीवाय ही केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्या अंतर्गत खातेधारकाला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

कमी गुंतवणुकीवर पेन्शनची हमी देण्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपयांच्या पेन्शनची हमी देते. सरकारच्या या योजनेमध्ये 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.

मे महिन्यात प्रीमियमची रक्कम कापली जाते

केंद्र सरकारने अनेक वर्षांपूर्वी PMSBY योजना सुरु केली होती. या योजनेतील 12 रुपयांचा प्रीमियम तुमच्या बँक खात्यामधून कापला जातो. 31 मे रोजी प्रीमियमची रक्कम वसूल केली जाते.

18 ते 70 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला PMSBY योजनेचा लाभ मिळतो. ही पॉलिसी खरेदी करताना तुमचे बँक खाते PMSBY योजनेशी लिंक करण्यात येते. पॉलिसीधारकाचा मृत्यू किंवा अपघातात अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांची रक्कम अदा केली जाते. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन PMSBY योजनेसाठी अर्ज करु शकता. याशिवाय, अनेक सरकारी आणि खासगी विमा कंपन्याही PMSBY इन्शुरन्स पॉलिसी विकतात.

अर्ज कसा करावा?

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर थेट कोणत्याही बँकेत जाऊन अर्ज करु शकता. याशिवाय बँक मित्र, विमा एजेंट किंवा सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांद्वारे या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता.

जर वेळेत हप्ता न भरल्यास तुमची पॉलिसी रद्द होते, पुन्हा रिन्यू होत नाही. प्रीमियम म्हणजेच या पॉलिसींचा हप्ता तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट म्हणजे आपोआप कट होतो. जर तुमच्या खात्यात हप्त्याचे पैसे नसतील तर तुमची पॉलिसी रद्द होऊ शकते. जर तुमचं बँक खातं बंद झालं असेल, तर त्या परिस्थितीतही पॉलिसी रद्द होऊ शकते.

संबंधित बातम्या:

नोकरदारांचे पीएफचे सर्व पैसे EPFO जमा होत नाही, मग कंपन्या हा पैसा कुठे ठेवतात?

क्रेडिट कार्डावरील एक्सपायरी डेटचा अर्थ काय, खरंच या तारखेनंतर क्रेडिट कार्ड ब्लॉक होते का?

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचा भाव