मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर लगेच धावपळ सुरु होते ती, मार्च एंडिंगची. मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने या महिन्यात लोकांना बँकिंग, गुंतवणूक आणि आयकराशी संबंधित अनेक कामे मार्गी लावावी लागतील. अनेकांकडून वर्षाच्या सुरुवातीलाच याबाबत नियोजन करण्यात येत असते. यामुळे या महिन्यात लोकांना बँकिंगशी निगडीत अनेक कामांचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असते. दुसरीकडे, होळी तसेच महाशिवरात्रीचे सण (Festival) याच मार्च महिन्यात साजरे केले जाणार आहे. एकाच वेळी दोन मोठे सण साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे बँकेत कोणतेही काम असल्यास ते याच महिन्यात करणे योग्य ठरणार आहे. मार्च महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध झोनमध्ये एकूण 13 दिवस बँकांमधील कामकाज बंद (March Holiday) राहणार आहे. प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला, आरबीआय बँकांच्या संपूर्ण वर्षाच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. आरबीआयने (RBI) 2022 च्या सुरुवातीला बँक ‘हॉलिडे लिस्ट 2022’ जारी केली होती. आरबीआय प्रत्येक राज्याचे विशेष सण आणि प्रसंगी ही यादी जारी करते. कोणत्या झोनमधील बँका कोणत्या सुट्टीच्या दिवशी बंद राहतील हेही आरबीआयने सांगितले आहे.
मार्चमध्ये बँकांना तब्बल तेरा दिवस सुट्या असणार आहे. त्यात विविध सण तसेच याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. रविवारी बँकांना सार्वजनिक सुटी असतेच. त्यात मोठे सणही याच महिन्यात येत असल्याने बँक कर्मचारी सुटीवर असणार आहे. त्यामुळे बँकांच्या सुट्यांचे नियोजन पाहूनच आपण आपल्या बँकींग कामाचे नियोजन करुन मनस्ताप टाळणे योग्य ठरणार आहे.
1 मार्च (मंगळवार) : महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनउ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
3 मार्च (गुरुवार) : लोसारच्या निमित्ताने गंगटोकमध्ये बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
4 मार्च (शुक्रवार) : चपचार कुटमुळे आयझॉलमधील बँकांना सुट्टी असणार आहे.
6 मार्च (रविवार) : रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असते.
12 मार्च (शनिवार) : महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
13 मार्च (रविवार) : रविवारी असल्याने सुटी राहिल.
17 मार्च (गुरुवार) : होळीनिमित्त डेहराडून, कानपूर, लखनौ आणि रांची झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल.
18 मार्च (शुक्रवार) : होळी, डोल यात्रेच्या निमित्ताने बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इम्फाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता सर्व झोन बंद राहतील.
19 मार्च (शनिवार) : होळी / याओसांगचा दुसरा दिवस असल्याने भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथील बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
20 मार्च (रविवार) : रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असते.
22 मार्च (मंगळवार) : बिहार दिनानिमित्त पाटणा झोनमध्ये बँका बंद राहणार आहेत.
26 मार्च (शनिवार) : महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
27 मार्च (रविवार) : रविवारी बँकांमध्ये साप्ताहिक सुट्टी असते.
आयपीओनंतर ‘एलआयसी’ व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करणार, खासगी विमा कंपन्यांना मोठा फटका!
अवघ्या 6 हजारात 1 एकर, ती पण डायरेक्ट चंद्रावर! प्रोफेसरनं कशी केली चंद्रावरील जमिनीची डील?
महागाईची तिसरी लाट येणार?; उत्पादन, सेवा क्षेत्रात दरवाढ अटळ