मुंबई : कोरोना काळात इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. तर अनेक पेनी स्टॉक्स मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Stocks) म्हणून उदयास आले आहेत आणि गुंतवणूकदारांना त्यांनी जोरदार परतावा देत मालमाला केले आहे. ज्या कंपनीचा व्यवहार पारदर्शक आणि फंडामेंटल चांगले आहेत, अशा पेनी स्टॉक्सचा (Penny Stocks) या यादीत समावेश आहे. नव्याने सुरुवात झालेल्या या कंपन्यांनी, नव्याने शेअर बाजारात दाखल झालेल्या या शेअर्सनी अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका अशी त्यांची कामगिरी आहे. त्यामुळे विश्लेषक आणि गुंतवणुकदारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांची कामगिरी एक दोन वर्षातील नाही तर अवघ्या पाच सहा महिन्यातील आहे, त्यामुळे ज्यांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक (Investment in Share) केली आहे. त्यांना छप्पर फाड कमाई झाली आहे. चला तर जाणून घेऊयात अशा मल्टीबॅगर शेअरविषयी…
BSE वर SEL Manufacturing Company चा स्टॉक 28 ऑक्टोबर 2021 रोजी 5.01 रुपयांवर बंद झाला होता. तर अवघ्या पाच महिन्यानंतर 1 एप्रिलला शेअर बाजार बंद होताना बीएसईवरील या शेअरचा भाव 470.55 रुपये इतका होता. म्हणजे पाचच महिन्यात या शेअरने गुंतवणुकदारांना असा परतावा दिला की जो इतर कोणताही स्टॉक देऊ शकत नाही. या शेअरने गुंतवणुकदारांना 9,292.21 रुपये इतका परतावा दिला आहे.
31 डिसेंबर 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 37.65 रुपये होती. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी या शेअरचा भाव 470.55 रुपयांच्या स्तरावर बंद झाला होता. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,149 टक्के परतावा दिला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 28 ऑक्टोबर 2021 रोजी शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि 1 एप्रिल 2022 पर्यंत ही गुंतवणूक त्याने वळती केली नसती, तशीच ठेवली असती. तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य यावेळी 93.92 लाख रुपयांवर गेले असते. त्यामुळे सहा महिन्यांपेक्षा ही अल्प कालावधीत या शेअरचे गुंतवणूकदार श्रीमंत झाले. अशाप्रकारे जर एखाद्या व्यक्तीने 31 डिसेंबर 2021 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य यावेळी 12.49 लाख रुपयांवर पोहोचले असते.
शेअर बाजारातील तज्ज्ञ, गुंतवणूकदारांना अशाच पेनी स्टॉक्स मध्ये गुंतवणुकीचा सल्ला देतात, ज्यांचे फंडामेंटल जोरदार आहे, नाहीतर उगीचच स्वस्तातील शेअरचा मोह तुम्हाला खड्यात घालू शकतो. तुमची गंगाजळी संपवू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील तज्ज्ञांचे मत जाणून घ्या, त्याचा सल्ला घ्या.
इतर बातम्या
नाशिक येथील अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून होणार चौकशी; आज, उद्या अनेक गाड्या रद्द
108MP कॅमेरासह Realme 9 4G भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स