नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : स्टॉक मार्केटमध्ये शेअरचे खरेदी-विक्री करणे अथवा तो जतन करण्यासाठी तो खात्यात कायम ठेवण्यासाठी डीमॅट खात्याची (Demat Account) अत्यंत आवश्यकता आहे. जर तुमच्याकडे पण डीमॅट खाते असेल तर तुम्हाला या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत एक काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही हे काम पूर्ण नाही केले तर डीमॅट खाते हाताळणे अत्यंत अवघड होईल. यापूर्वी पण हे काम पूर्ण करण्यासाठी, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अनेकदा मुदतवाढ दिली आहे. पण आधार-पॅनकार्ड अथवा इतर कार्डच्या अनुभवावरुन बाजारा नियामक सिक्युरिटी आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) गुंतवणूकदारांना अजून मुदतवाढ देईल असे वाटत नाही. त्यामुळे या महिन्याच्या आतच हे काम पूर्ण करुन घ्या.
वारसाचे जोडा नाव
शेअर बाजारात स्टॉक खरेदी-विक्रीसाठी डीमॅट खात्याची गरज असते. सेबीने डीमॅट खात्यात वारस जोडण्यासाठी यापूर्वी पण संधी दिली होती. तरीही अनेक शेअरधारकांनी, डीमॅट खातेदारांनी डीमॅट खात्यात वारसाची जोडणी केली नाही. वारस जोडण्यासाठी आता या 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.
तर खाते होईल फ्रीज
जर डीमॅट खातेधारकांनी या निश्चित कालावधीत वारसाची (Demat Account Nomination)जोडणी केली नाही, तर खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बाजार नियामक सेबी अशा खातेधारकांचे खाते फ्रीज पण करु शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांना शेअरची खरेदी विक्री करता येणार नाही.
अनेकदा वाढवली अंतिम मुदत
बाजार नियामक सेबीने यापूर्वी पण डीमॅट खातेधारकांना नॉमिनेशन पूर्ण करण्यासाठी संधी दिली होती. पण अनेकदा ही डेडलाईन वाढविण्यात आली. पूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत 31 मार्च, 2023 रोजी संपली होती. परंतु, 27 मार्च रोजी सेबीने एक अधिसूचना काढली. त्यात वारसाचे नाव जोडण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर सेबीने गुंतवणूकदारांना एकूण 6 महिन्यांचा जादा वेळ दिला. यापुढे मुदत वाढ मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर वारसाचे नाव जोडून घ्या.
डीमॅट खात्यात कसे जोडणार वारसाचे नाव