Budget 2022 : कालपासून गॅस स्वस्त झाल्याचा पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे. पण या बतावणीला बळी पडू नका. कारण हा गॅस सिलेंडर स्वस्त नाही तर वजनाने हलका झाला आहे. त्याला कंपोझिट सिलेंडर (Composite Cylinder) म्हणतात. दहा किलोची हांडी 636 रुपयांना सध्या तरी देशातील काही शहरांत उपलब्ध आहे. तेल कंपन्यांनी ग्राहकांसाठी स्वस्त एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG cylinder) पर्याय आणला आहे. हा पर्याय स्वीकारल्यानंतर महागडे गॅस सिलेंडर खरेदी करण्याची गरज भासणार नाही एवढंच. 14 किलोची गॅस टाकी घेण्याऐवजी तुम्हाला सहज उचलता येईल अशी दहा किलो गॅसची हांडी मिळेल. नव्या पर्यायामुळे तुम्हाला फक्त 636 रुपयांत गॅस सिलेंडर मिळणार आहे. हा सिलेंडरचा एक नवीन प्रकार आहे ज्याला कंपोझिट सिलेंडर असे नाव देण्यात आले आहे.सध्या इंडेन (Indian Oil) हा सिलिंडर देत आहे. हा सिलेंडर वजनाने हलका असल्याने तो उचलण्यास सोपा राहिल. तसेच गॅसची हांडी पारदर्शक असल्याने गॅस कमी आला, गॅस चोरला ही ओरड ही राहणार नाही. काही दिवसांतच इतर गॅस कंपन्या हा पर्याय तयार करतील. मात्र एवढ्याने हुरळून जाऊ नका. तुमचा 14 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच बाजारभावाने तुम्हाला सध्या मिळणार आहे. हजार रुपयांच्या आतबाहेर हा गॅस तुम्हाला सध्या मिळत असेल. त्यामुळे दर महिन्यांचं घराचं बजेट सांभाळताना गृहिणींची तारेवरची कसरत ठरलेली आहे.
कंपोझिट गॅस सिलिंडर लोखंडी गॅस सिलिंडरपेक्षा वजनाने 7 किलो हलका असतो. त्यामुळे त्याची ने-आण करणे सोपे असते. घरगुती गॅस सिलिंडरचे वजन 17 किलो असते. कंपोझिट सिलिंडर वजनात हलके असले तरी ते मजबूत असतात. यामध्ये थ्री-लेअर (Three Layer) असतात. 10 किलोच्या कंपोझिट सिलिंडरमध्ये तेवढाच गॅस असतो. त्यामुळे याचे एकूण वजन 20 किलो एवढे होते. तर लोखंडी गॅस सिलिंडरचे गॅस मिळून एकूण वजन 30 किलो पेक्षा जास्त होते.
सध्या 28 शहरांमध्ये हा कम्पोझिट सिलेंडर उपलब्ध आहे, मात्र लवकरच तो सर्व शहरांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं इंडियन ऑईलने म्हटलं आहे. इंडेनच्या वेबसाइटनुसार, जयपूरमध्ये या गॅसचा दर 636 रुपये 50 पैसे, मुंबईत 634 रुपये, कोलकातामध्ये 652 रुपये, चेन्नईत 645 रुपये, लखनऊमध्ये 660 रुपये, इंदूरमध्ये 653 रुपये, भोपाळमध्ये 638 रुपये, गोरखपूरमध्ये 677 रुपये या सिलेंडरची किंमत आहे. लवकरच हे सिलेंडर देशभरात उपलब्ध होतील.केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला जाहीर झालेल्या गॅस सिलेंडरच्या किंमतींमुळे त्रिकोनी, चौकोनी कुटुंबाला दिलासा मिळेल.14.2 किलो घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, तर 19 किलोचा कमर्शियल गॅस सिलेंडर आता 1921 रुपये 50 पैशांना मिळणार आहे.
नवीन ग्राहकांना कंपोझिट गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तर नवीन जोडणी(Connection) करुन घ्यावी लागेल. इंडेन (Inden) ने याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, नवीन कंपोझिट गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तर ग्राहकांना 10 किलोसाठी 3350 रुपये आणि 5 किलो वजनाच्या सिलिंडरसाठी 2150 रुपये मोजावे लागतील. 10 किलोच्या सिलिंडरसाठी जवळपास 692 रुपये तर 5 किलो वजनासाठी 363 रुपये मोजावे लागतील. या गॅसला जुने रेग्युलेटर लावलेले असतील. सिलिंडर पारदर्शक असल्याने गॅस किती शिल्लक आहे हे बाहेरून दिसेल.
कंपोझिट सिलेंडर वजनाने हलका आणि पारदर्शी हांडीत येतो
सध्या इंडेन म्हणजेच इंडियन ऑइल हा सिलिंडर उपलब्ध आहे
तेल कंपनीने ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आणला आहे
नव्या पर्यायांसह महागडे गॅस सिलेंडर खरेदीपासून ग्राहकाची सुटका होईल
संबंधित बातम्या :
Budget 2022 : काय स्वस्त, काय महागलं?
साडी में साडी हँडलूमची सिल्क साडी! बजेटपेक्षाही चर्चा अर्थमंत्र्यांच्या साडीची! किंमत किती?
देशात डिजिटल युनिव्हर्सिटी होणार, शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात आणखी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा?