‘हा’ व्यवसाय सुरु केल्यास दिवसाला कमवाल पाच हजार रुपये, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Nov 09, 2021 | 12:50 PM

एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्याची किंमत सुमारे 30 रुपये आहे आणि बाजारात ते 70 रुपये किलो दराने सहज विकले जातात. जर तुम्ही एका दिवसात 100 किलो कॉर्न फ्लेक्स विकले तर तुमचा नफा सुमारे 4000 रुपये होईल. दुसरीकडे, जर तुम्ही महिन्याचा आकडा काढला तर तुम्हाला 1,20,000 रुपयांपर्यंत कमाई होईल.

हा व्यवसाय सुरु केल्यास दिवसाला कमवाल पाच हजार रुपये, जाणून घ्या सर्वकाही
कॉर्नफ्लेक्स
Follow us on

नवी दिल्ली: नवी दिल्ली: सध्याच्या काळात कोरोनामुळे नोकऱ्या आणि थेट लोकांशी संबंध येणाऱ्या उद्योगांविषयी अनिश्चिततेचे वातावरण आहे. एखादं दुकान टाकायचं म्हटलं तर सरकार कधी आणि कितीवेळा लॉकडाऊन लावेल, याचा नेम नाही. अशा परिस्थितीत बंद जागेत राहूनच एखादा उद्योग करणे हे फायद्याचे ठरेल. अशावेळी कॉर्नफ्लेक्स तयार करण्याचा उद्योग फायदेशीर ठरु शकतो. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही दिवसाला चार ते पाच हजारांची कमाईही करु शकता. या हिशेबाने तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई कराल.

मक्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये बहुतेक घरांमध्ये कॉर्नफ्लेक्सचे सेवन केले जाते. त्यामुळे बाजारपेठेत कॉर्नफ्लेक्सला कायमच चांगली मागणी असते. तुमची शेती असेल तर मक्याचे उत्पादन घेऊन तुम्ही फायद्यात आणखी भर पाडू शकता. याशिवाय साठवणुकीसाठीही जागा आवश्यक आहे. तुमच्याकडे एकूण 2000 ते 3000 चौरस फूट जागेची गरज लागेल. या व्यवसायासाठी लागणार्‍या उपकरणांबद्दल बोलायचे झाले, तर मशिन, वीज सुविधा, जीएसटी क्रमांक, कच्चा माल, जागा आणि साठा ठेवण्यासाठी गोदाम लागेल.

व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य जागा

या व्यवसायात वापरल्या जाणार्‍या या मशिन्सचा उपयोग मक्यापासून बनवलेले कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठीच केला जात नाही, तर गहू आणि तांदळाचे फ्लेक्स बनवण्यासाठीही वापरता येतो. शक्यतो मक्याचे जास्त उत्पादन असलेल्या भागात हा व्यवसाय सुरू करा. जर आपण दूरच्या ठिकाणाहून मका आणून त्यांचे कॉर्न फ्लेक्स बनवले तर ते खूप महाग पडेल. त्यामुळे आपण अशी जागा शोधली पाहिजे जिथे आपल्याला चांगल्या प्रतीचा मका मिळेल किंवा तो स्वतः पिकवता येईल.

किती फायदा होईल?

एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्याची किंमत सुमारे 30 रुपये आहे आणि बाजारात ते 70 रुपये किलो दराने सहज विकले जातात. जर तुम्ही एका दिवसात 100 किलो कॉर्न फ्लेक्स विकले तर तुमचा नफा सुमारे 4000 रुपये होईल. दुसरीकडे, जर तुम्ही महिन्याचा आकडा काढला तर तुम्हाला 1,20,000 रुपयांपर्यंत कमाई होईल. जर आपण पैशाच्या गुंतवणुकीबद्दल बोललो, तर हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला व्यवसाय लहान स्तरावर सुरू करायचा आहे की मोठ्या स्तरावर, या व्यवसायासाठी सुरुवातीला किमान 5 ते 8 लाखांची गुंतवणूक करावी लागेल.

संबंधित बातम्या: 

नोकरीची चिंता सोडा, ‘हा’ व्यवसाय सुरु करा, सरकारकडून 35 ते 90 टक्के अनुदान, महिन्याला दोन लाखांची कमाई

मत्स्यपालन ठरेल आर्थिक कमाईचा राजमार्ग, पेंग्बा मासे विक्रीतून एक व्यक्ती 45 लाखांची उलाढाल करतेय

भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?