नवी दिल्ली: सध्याच्या काळात कोरोनामुळे नोकऱ्या आणि थेट लोकांशी संबंध येणाऱ्या उद्योगांविषयी अनिश्चिततेचे वातावरण आहे. एखादं दुकान टाकायचं म्हटलं तर कोरोनाची लाट पुन्हा आल्यास सरकार कधी आणि कितीवेळा लॉकडाऊन लावेल, याचा नेम नाही. अशा परिस्थितीत बंद जागेत राहूनच एखादा उद्योग करणे हे फायद्याचे ठरेल. अशावेळी टॉमेटो कांद्याची पेस्ट तयार करण्याचा उद्योग फायदेशीर ठरू शकतो.
कांदा हा जवळजवळ सर्व घरात वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. देशात कांद्याच्या किरकोळ किमती 50-60 रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत. कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे कांद्याच्या पेस्टची मागणी वाढते. बाजारपेठेतील मागणीमुळे कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय चांगला चालू शकतो. सुलभ तंत्रज्ञानामुळे, कोणीही त्याचे युनिट सेट करू शकतो आणि या व्यवसायातून चांगले पैसे कमवू शकतो.
मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र ही कांद्याची प्रमुख उत्पादक राज्ये आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे किरकोळ बाजारातही त्यांच्या किमतींवर परिणाम झाला आहे. जर तुमचाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची योजना असेल तर तुम्ही कांदा पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.
खादी ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) कांदा पेस्ट बनवण्याच्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यानुसार या व्यवसायासाठी 4.19 लाखांचे भांडवल लागते. जर तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही सरकारच्या मुद्रा योजनेतून कर्ज घेऊ शकता.
कांदा पेस्ट उत्पादन युनिट उभारण्यासाठी एकूण खर्च 4,19,000 रुपये आहे. यामध्ये 1 लाख रुपये बिल्डिंग शेड बांधण्यासाठी आणि 1.75 लाख रुपये उपकरणांसाठी (तळण्याचे पॅन, ऑटोक्लेव्ह स्टीम कुकर, डिझेल भट्टी, स्टरलायझेशन टाकी, लहान भांडी, मग, कप इ.) खर्च होतील. तसेच दैनंदिन खर्चासाठी 2.75 लाख रुपये आवश्यक असतील.
कांद्याची पेस्ट बनवण्याच्या व्यवसायावर तयार केलेल्या अहवालानुसार, तुम्ही एका वर्षात 193 क्विंटल कांदा पेस्ट तयार करू शकता. 3,000 रुपये प्रति क्विंटलच्या हिशेबाने त्याची किंमत 5.79 लाख रुपये असेल.
जर तुम्ही पूर्ण क्षमतेने कांद्याची पेस्ट तयार केली तर एका वर्षात तुम्ही 7.50 लाख रुपयांची विक्री करू शकता. जर यातून सर्व खर्च वजा केले तर ग्रॉस सरप्लस 1.75 लाख रुपये होईल. तर निव्वळ नफा साधारण 1.48 लाख रुपये असू शकतो. जर तुम्ही भाड्याच्या जागेऐवजी तुमच्या घरात हा व्यवसाय सुरू केलात तर तुमचा नफा आणखी वाढेल. घरी व्यवसाय सुरू केल्यास एकूण प्रकल्प खर्च कमी होईल आणि नफा वाढेल.
संबंधित बातम्या:
मत्स्यपालन ठरेल आर्थिक कमाईचा राजमार्ग, पेंग्बा मासे विक्रीतून एक व्यक्ती 45 लाखांची उलाढाल करतेय
भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?