सोनेरी ऑफर, स्वस्तात मिळवा सोने, ही संधी पुन्हा नाही 

| Updated on: Jan 08, 2022 | 9:39 AM

गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे. सोमवारपासून पुढील 4 दिवस या योजनेत हिस्सेदार(Subscription/subscribe) होता येईल. त्यासाठी गोल्ड बाँडचे निर्गम मूल्य (Issue Price) जाहीर करण्यात आले आहे. 10  ते 14 जानेवारी दरम्यान गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता येईल. निर्गम मूल्य चुकते करुन हिस्सेदार होता येईल 

सोनेरी ऑफर, स्वस्तात मिळवा सोने, ही संधी पुन्हा नाही 
आरबीआय बँक
Follow us on

रिझर्व्ह बँकेने (RBI)सोनेरी ऑफर आणली आहे. स्वस्तात सोने खरेदी करण्याची आयती संधी  बँकेने उपलब्ध करुन दिली आहे. गोल्ड बाँडमध्ये (Gold Bond Scheme 2021-22)  गुंतवणुकीची संधी बँकेने उपलब्ध करुन दिली आहे. रिझर्व्ह बँकेने नवीन हप्त्यासाठी इश्यू प्राईस (Gold bond issue price) निर्गम मूल्य/ बाजार मूल्य घोषीत केले आहे. वाचा गोल्ड बाँड विषयी सर्वकाही

गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीची आणखी एक संधी 

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीसाठी 5 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान या बाँडमध्ये हिस्सेदार होता येईल. योग्य ती किंमत देऊन त्याचे सदस्यत्व सर्वसामान्य गुंतवणुकदाराला घेता येईल. बाँडचे इशु प्राईस अर्थात बाजारातील पदार्पणाची निर्धारीत किंमत 4,786 रुपये प्रति ग्रॅम अशी असणार आहे. गोल्ड बाँडमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणा-या सदस्यांना, हिस्सेदारांना विशेष सूट देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करणा-या आणि किंमत ही ऑनलाईन अदा करणा-या सदस्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन सदस्यांसाठी गोल्ड बॉंडची पदार्पणाची निर्धारीत किंमत 4,736 रुपये प्रति ग्रॅम असेल यापूर्वी 29 नोव्हेंबर रोजीच्या इश्यू प्राईससाठी अर्जदारांना प्रति ग्रॅम 4,791 रुपये मोजावे लागले होते. 3 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत या गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता आली होती.

गोल्ड बाँडचे वैशिष्टये

थेट सोने खरेदी न करता सोन्यात गुंतवणुकीची संधी मिळते

सोने जवळ बाळणग्याची गरज नाही

सरकारी सुरक्षेतंर्गत या योजनेत सोन्यावर व्याजही मिळते

गोल्ड बाँडमध्ये लॉक-इन कालावधी असतो. ठराविक कालावधीपर्यंत गुंतवणूक ठेवावी लागते

गोल्ड बाँडला सरकारकडून संरक्षण मिळते

सोने खरेदीसाठी ग्राहक चलनाचा वापर करतो आणि चलन रुपातच त्याला परतावा मिळतो

सरकारतर्फे रिझर्व्ह बँक गोल्ड बाँड बाजारात दाखल करते

गुंतवणुकदाराला 1 ग्रॅम ते 4  किलो पर्यंत गोल्ड बाँड खरेदी करता येतो

तर संस्थांसाठी ही मर्यादा 20 किलोपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कमी नुकसानीची हमी 

तुम्ही प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करत नसला तरी गोल्ड बाँडमध्ये निश्चित सोनेदरावरच खरेदी करता येते

अर्थात तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याचे प्रमाण सुरक्षित असते. त्याची किंमत नाही

कालमर्यादा संपल्यानंतर सध्यस्थितीतील किंमतीनुसार तुम्हाला परतावा मिळतो.

हा परतावा कमी अथवा अधिक असू शकतो.

तसेच बाँडवर सरकार  व्याज देत असल्याने कमी नुकसानीची आपोआप हमी मिळते

कुठे करु शकता गुंतवणूक

रिझर्व्ह बँकेने नेमूण दिलेली बँका, टपाल खाते, त्याच्याशी संबंधित शाखा, स्टॉक एक्सचेंज याठिकाणी गोल्ड बाँड खरेदी करता येतात. ब्रोकर, एजंट यांच्याकडूनही खरेदीचा पर्याय उपलब्ध आहे. डीमॅट अकाऊंटच्या माध्यमातूनही बाँडमध्ये गुंतवणूक करता येते.

 

इतर बातम्या :

वाहन उद्योग संकटात, सलग चार महिन्यांपासून वाहन विक्रीमध्ये घट

2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानलाही टाकणार मागे; ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

GOLD LOAN: वैयक्तिक की सोने तारण कर्ज, ‘या’ पाच कारणांमुळे ‘हा’ पर्याय सर्वोत्तम!