मुंबई : घर (Dream Home) घेण्याचे अनेकांचे मनोहारी इमले महागाईमुळे जमीनदोस्त होऊ पाहत आहेत. कर्जाचा अर्जही बँक मंजूर करते आणि डाऊन पेमेंटची व्यवस्था केली असली तरी अनेकांच्या घराचे स्वप्न दूर आहे. बांधकाम साहित्याचे (Real estate Material) दर दिवसागणिक वाढतच आहे.गेल्या वर्षभरात सिमेंट 22 टक्के महाग झालं आहे. स्टीलच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात बांधकामाचा खर्च 10 ते 12 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी सवलती आणि ग्राहकांसाठी सुरू केलेल्या आकर्षक ऑफर्स (Exclusive Offers) रद्द केल्या आहेत. दुसरीकडे घरांच्या किंमतीतही 7 ते 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक बंगला बने न्यारा चे स्वप्न अनेकांनी गुंडाळून ठेवले आहे. गृहकर्ज महागण्याची शक्यता, बांधकाम साहित्य महागल्याने गृहखरेदी सोपी राहिली नाही, आधी समजून घ्या घराच्या किंमती का वाढल्या.
खरं तर घर बांधण्यासाठी वापरण्यात येणारी प्रत्येक गोष्ट गेल्या वर्षभरात महाग झाली आहे. सिमेंट, सारिया, तांबे, अॅल्युमिनियम . सर्वांच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात सिमेंट 22 टक्के महाग झालं आहे. स्टीलच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तांबे आणि अॅल्युमिनिअमच्या किंमतीनी गेला वर्षभरातील विक्रम मोडीत काढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढला असून आता कामगारांचा तुटवडाही जाणवत आहे.
घर बांधणीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे रिअल इस्टेट कंपनी कोलियर्सच्या अहवालात स्पष्ट केले आहे. बांधकामाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 67 टक्के खर्च हा वापरण्यायोग्य वस्तूंवर करण्यात येतो. तर 28 टक्के खर्च हा कामगारांवर केला जातो आणि इंधनाच्या किमतींचा खर्च 5 टक्के आहे.बांधकाम साहित्यात प्रत्येक गोष्ट महागडं झालेली आहे. गेल्या वर्षभरात बांधकामाचा खर्च 10 ते 12 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये निवासी मालमत्तेचा बांधकाम खर्च प्रति चौरस फूट 2060 रुपये होता, तो यंदा 2300 रुपये झाला आहे. यासोबतच औद्योगिक बांधकामाचा खर्चही वाढला आहे.
रिअल इस्टेट क्षेत्र कोरोनामुळे आणि मंदीमुळे अगोदरच होरपळलेले आहे. लॉकडाऊन हटल्या नंतर बांधकाम क्षेत्रात अजुनही म्हणावी तशी मागणी वाढलेली नाही. मागणी नसतानाही बिल्डरांनी घरांच्या किमती वाढवल्या आहेत. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी प्रोपटायगरने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत वर्षभराच्या आधारावर देशातील आठ प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर घरांच्या सरासरी किंमतीतही या काळात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या किंमती आणखी वाढू शकतात. सिमेंट, सळई आणि इतर बांधकाम साहित्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे कोलियर्सचे रमेश नायर सांगतात. यंदाच्या डिसेंबरपर्यंत घरबांधणीचा खर्च आणखी 8-9 टक्क्यांनी वाढू शकतो, असा विश्वास रमेश नायर यांनी व्यक्त केला आहे. या एकूण चर्चेचा एकूण सार म्हणजे परवाडणारजोगी घरे अद्याप ही सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.
संबंधित बातम्या :
…गृह कर्ज घेतायं?, प्रक्रिया ते फोरक्लोजर शुल्क, जाणून घ्या-सर्व एकाच क्लिकमध्ये
नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार
फक्त गुंतवणुकीतूनच नाही तर ‘या’ मार्गाने देखील वाचवा टॅक्स; जाणून घ्या टॅक्स बचतीचे सोपे मार्ग