नवी दिल्ली : सध्या लाखमोलांचा झालेला मोबाईल हरवला (Lost Mobile) तर अनेकांना जेवण बेचव लागते, इतके आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत. मोबाईल ही आता गरज झाली आहे. मोबाईलच्या माध्यमातून जगच हाती आल्याने त्याचं महत्व वाढलं आहे. स्मार्टफोन हरवल्यानंतर अनेक जण तो मिळण्याची आशा सोडून देतात. तर काहीजण पाठपुरावा करुन तो मिळवितात. स्मार्टफोनमध्ये वैयक्तिक डाटा, नेट बँकिंग, युपीआय यासारख्या अनेक माहितींची नोंद असते. त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यावर, हरवल्यावर तो ब्लॉक करणे हिताचे असते. आता हरवलेला मोबाईल तुम्हाला आता काही मिनिटांतच शोधता (Lost Mobile Tracking System) येणार आहे. त्याचे लोकेशन सापडणार आहे. पण ही प्रक्रिया पूर्ण तरी कशी करणार, जाणून घ्या एका क्लिकवर..
संचार साथी पोर्टल
संचार साथी पोर्टलच्या (Sanchar Saathi Portal) मदतीने चोरीला गेलेला मोबाईल सहज ट्रॅक करता येईल. तसेच तो ब्लॉक पण करत येईल. या पोर्टलवर तुम्हाला हरवलेल्या मोबाईलची तक्रार दाखल करता येईल. तसेच मोबाईल ट्रॅक करता येईल. चोरट्याला पकडता येईल. तसेच या पोर्टलच्या मदतीने एका आयडीवर किती सिमकार्ड देण्यात आले आहे, याची माहिती घेता येईल.
CEIR चा पुढाकार
केंद्र सरकारने CEIRने Portal सुरु केले आहे. या पोर्टलवर हरवलेला, विसरलेला, चोरलेल्या स्मार्टफोनचे ट्रॅकिंग करता येईल. या यंत्रणेची चाचपणी सुरुवातीला काही राज्यात आजपासून करण्यात येत आहे. आता देशभरातील मोबाईलधारकांना त्याचा फायदा होईल. CEIR पोर्टलवर लॉगिन करुन तुम्हाला हरवलेला मोबाईल ब्लॉक करता येईल. पण त्यासाठी FIR ची कॉपी आणि मोबाईलचा तपशील लागेल.
मोबाईल स्क्रॅप पॉलिसी
Apple सारखे ब्रँडही देशात दाखल झाल्या आहेत. त्यांनी देशात iPhone तयार करण्यास सुरुवात केली आहे. देशातील 120 कोटी जनतेकडे कोणता ना कोणता मोबाईल आहे. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक वेस्ट (Electronic Waste) ही भारतासाठी मोठी समस्या ठरत आहे. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजच्या दाव्यानुसार, वाहन स्क्रॅप पॉलिसीच्या धरतीवर लवकरच देशात मोबाईलसाठी पण स्क्रॅप पॉलिसी (Mobile Scrap Policy ) येऊ शकते.
असा करा मोबाईल ब्लॉक