नवी दिल्ली: 1 नोव्हेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. हे सर्व नियम आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात, त्यातील बदलांचा आपल्या खर्चावर मोठा परिणाम होऊ शकतो. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल असोत किंवा बँकेशी संबंधित नियम, त्यांचा थेट संबंध आपल्या आयुष्याशी असतो. त्यामुळे 1 तारीख येण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या जेणेकरून बदल वेळेवर आणि योग्य पद्धतीने हाताळता येतील. या चार बदलांमध्ये एलपीजी वितरण प्रणालीतील बदल, ठेवी आणि पैसे काढण्याबाबतचे बँक नियम, एलपीजीच्या किंमती आणि रेल्वेचे वेळापत्रक यांचा समावेश आहे.
गॅस एजन्सीच्या विक्रेत्याकडून एलपीजी सिलिंडर घरपोच मिळेल, त्यांना पुढील महिन्यापासून नवीन नियमांनुसार या सेवेचा लाभ मिळू शकेल. नवीन नियम असा असेल की आता ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो OTP गॅस विक्रेत्याला सांगावा लागेल. या ओटीपीच्या आधारे एलपीजी सिलिंडर घरपोच दिला जाईल.
या नवीन बदलाला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) असे नाव देण्यात आले आहे. सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि सिलिंडरचा काळाबाजार रोखता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यापूर्वी कुणाचा सिलिंडर दुसऱ्याला चढ्या किंमतीत विकला जात होता, मात्र ओटीपी व्यवस्था सुरु केल्याने तसे होणार नाही.
भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळेत बदल करणार आहे. 1 नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवे वेळापत्रक लागू होणार आहे. एका अहवालानुसार, पॅसेंजर गाड्यांसोबतच मालगाड्यांचाही नव्या बदलांमध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे वेळापत्रक बदलू शकते. त्याचप्रमाणे देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे. कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर, रेल्वे आपल्या गाड्यांची संख्या वाढवत आहे, परंतु वाहतूक अजूनही संपूर्णरित्या पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वे सध्या फक्त विशेष गाड्या चालवत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल आणि वायूच्या किमतीत झपाट्याने होत असलेली वाढ पाहता, 1 नोव्हेंबरला एलव्हीजी सिलिंडरच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात. त्यामुळे 1 नोव्हेंबरला एलपीजीच्या किमती वाढू शकतात, असे ग्राहकांनी गृहीत धरावे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे 6 ऑक्टोबर रोजी एलपीजीच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजीच्या किंमती वाढवण्यात आल्या. यासह जुलैपासून 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत एकूण 90 रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्ली आणि मुंबईमध्ये एलपीजीची किंमत 899.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. तर कोलकात्यात तो 926 रुपये आहे.
बँक ऑफ बडोदात 1 नोव्हेंबरपासून बँकेत रोख रक्कम जमा करणे आणि पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. बँक ऑफ बडोदाकडून यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे. बँक एका ठराविक मर्यादेनंतर रोख रक्कम काढणे किंवा रोख रक्कम जमा करण्यावरील शुल्कात बदल करणार आहे. हा नवा नियम बचत आणि सॅलरी या दोन्ही खात्यांवर लागू होणार आहे. बँक ऑफ इंडिया, पीएनबी, अॅक्सिस बँक आणि सेंट्रल बँकही लवकरच असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
संबंधित बातम्या:
Masked Aadhar Card | मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय? किती आहे सुरक्षित आणि कुठे होतो वापर?
तुमचं आधार कार्ड बनावट आहे का? एका मिनिटात तपासून पाहा
व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही