मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : भारतीय रेल्वे लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर वाहतूकीचा पर्याय आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाला पहिली पसंती असते. मात्र कधी कधी तुम्ही रेल्वे प्रवासाचा बेत ऐकून तिकीट आरक्षित करता परंतू अचानक महत्वाचे इतर काम आल्याने तुमचा प्रवासाचा प्लान चौपट होतो. त्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीटे रद्द करावी लागतात. त्यामुळे कॅन्सल चार्ज देखील भरावा लागतो. हा कॅन्सलेशन चार्ज ट्रेन रवाना होण्यापूर्वी किती वेळा पूर्वी तुम्ही तिकीट रद्द करता त्यावर ठरतो. चला पाहूया किती वेळासाठी किती कॅन्सलेशन चार्ज कापला जातो.
रेल्वेमध्ये तिकीट कॅन्सल करताना दोन कॅटगरी असते. पहिला चार्ट तयार करण्यापूर्वी आणि दूसरा चार्ट बनल्यानंतर, यावरुन ठरते की तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना त्यातून चार्जेस कापून किती रिफंड मिळणार आहे.
एसी फर्स्ट क्लास/एक्झिक्युटिव्ह क्लास – 240 रु.
एसी 2 टियर/फर्स्ट क्लास – 200 रु.
AC 3 टियर/AC चेअर कार/AC3 इकॉनॉमी- 180 रु.
स्लीपर क्लास – 120 रु.
द्वितीय श्रेणी – ६० रु.
जर कन्फर्म तिकीट ट्रेन रवाना होण्याच्या 48 ते 12 तासांपर्यंत रद्द केले तर ट्रेन तिकीटांच्या एकूण किंमतीच्या 25 टक्के आणि किमान निश्चित केलेला फ्लॅट भाडे जे जास्त असतो तो कापला जातो. तर 12 तासांपेक्षा कमी वेळे चार्ट बनण्याआधी कन्फर्म तिकीट कॅन्सल केल्यानंतर 50 टक्क्यांपर्यंत रिफंड मिळतो.
जर चार्ट तयार झाला आहे तर कन्फर्म तिकीट रद्द करता येत नाही. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार अशा प्रवाशांना ऑनलाईन टीडीआर फाईल करवा लागतो. तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातून आपल्या रिफंड केसचा पाठपुरावा करावा लागतो. जर ट्रेन रवाना होण्याच्या चार तास आधी टीडीआर फाईल केला नाही तर कन्फर्म तिकीटावर कोणताच रिफंड मिळत नाही.