Pure Gold : किती अस्सल आहे तुमचं पिवळेधम्मक सोनं! जाणून घ्या एका क्लिकवर

| Updated on: Apr 20, 2023 | 8:18 PM

Pure Gold : तुमचं सोनं किती अस्सल आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते, कारण प्रत्येकाला फसविले जाण्याची भीती असते. तेव्हा शुद्धतेचे परिमाण काय आहे ते तर जाणून घ्या..

Pure Gold : किती अस्सल आहे तुमचं पिवळेधम्मक सोनं! जाणून घ्या एका क्लिकवर
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय सोन्यासाठी किती वेडे आहेत, हे वेगळं सांगायला नको. भारतीयांचं सुवर्णप्रेम जगभरात प्रसिद्ध आहे. चीननंतर जगात भारत हा सर्वाधिक सोन्याची आयात (Gold Import) करणारा देश आहे. देशात सोन्याची आभुषणं आणि दागिन्यांचे अधिक प्रचलन आहे. भारतीय सण, उत्सव, लग्न, कार्यक्रमासाठी सोने खरेदी करणे पसंत करतात. काही जण गुंतवणूक म्हणून सोन्यात मुहूर्त साधत गुंतवणूक करतात. परंतु, अनेकदा सराफा बाजारात ग्राहकांची फसवणूक (Fraud) होते. सोन्याचा दर्जा, गुणवत्ता फिक्की पडते. पण ही बाब कळायला अनेक दिवस जातात. तर काहींना सोने घेतल्यानंतर सातत्याने फसवणुकीची चिंता सतावते,तेव्हा शुद्धतेचे परिमाण काय आहे ते तर जाणून घ्या..

सोन्याची गुणवत्ता
सोन्याची गुणवत्ता कॅरेटमध्ये मोजतात. कॅरेट हे परिमाण आहे. सोने जितके अधिक शुद्ध ते तेवढे सोप्यारित्या मोडले जाते. वितळते. सोन्याच्या धातू पासून अनेक दागिने, आभुषणे व इतर वस्तू तयार करण्यात येतात. सोन्याला विविध आकारात मोडता येते. सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना मजबूत करण्यासाठी यामध्ये इतर धातूंचे मिश्रण करतात. त्यामुळे सोन्यापासून तयार होणाऱ्या वस्तू सहजासहज तूटत नाहीत.

किती कॅरेटचे सोने

हे सुद्धा वाचा

24 कॅरटचे सोने
24 कॅरेट सोने 99.99 टक्के शुद्ध असते. यामध्ये इतर कोणत्याच धातूचा समावेश नसतो. हे सोन्याचे सर्वात शुद्ध रुप मानण्यात येते. याचा दर्जा आणि गुणवत्तेमुळे या सोन्याची किंमत जास्त असते. 24 कॅरेट सोन्याचा उपयोग सोन्याची शिक्के, तुकडे, बिस्किट तयार करण्यासाठी करतात. तसेच औषध, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सुद्धा याचा वापर करण्यात येतो.

22 कॅरेट सोने
22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोने असते. इतर 8.33 टक्के अन्य धातूंचे मिश्रण असते. या धातूंमध्ये प्रामुख्याने चांदी आणि तांब्याचा वापर होतो. 22 कॅरेट सोने पण शुद्ध मानण्यात येते. पण हे सोने 24 कॅरेट सोन्यापेक्षा कमी शुद्ध असते. सोन्याची दागिने, आभुषणे तयार करण्यासाठी याच सोन्याचा अधिक वापर होतो. हे दागिने महत्वाच्या कार्यक्रमात, फंक्शन यासाठीच घालण्यात येतात. हे दागिने वजनाने हलके आणि नरम असतात.

18 कॅरेट सोने
18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने आणि 25 टक्के चांदी आणि तांब्याचा वापर करण्यात येतो. 18 कॅरेट सोन्यात इतर धातूंचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने हा धातू कठोर होतो. हे दागिने, आभुषणे, आंगठी, गळ्यातील चैन रोजच्या वापरासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे रोजच्या वापरासाठी जे सोन्याचे दागिने तयार होतात, ते शक्यतोवर 18 कॅरेट सोन्याचेच असतात.

14 कॅरेट सोने
14 कॅरेट सोन्यात इतर धातूंची संख्या अधिक असते. यामध्ये केवळ 58.3 टक्के शुद्ध सोने असते. इतर 41.7 टक्के निकेल, चांदी, जस्त या धातूंचे मिश्रण असते.