Cheque Tips : ही चूक पडू शकते महागात! खाते होईल साफ

| Updated on: Aug 27, 2023 | 6:29 PM

Cheque Tips : बँकेची कामे सावधानपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यात थोडीही चूक झाली तर लाखोचा फटका बसू शकते. तुमचे खाते साफ होऊ शकते. बँकेत गेल्यानंतर शक्यतोवर स्वतःचाच पेन वापरावा. इतर कोणाचा पेनचा वापर केल्यास त्याचा फटका बसू शकतो, काय आहे हा प्रकार, जाणून घेऊयात.

Cheque Tips : ही चूक पडू शकते महागात! खाते होईल साफ
Follow us on

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : अनेक व्यवहार आजही चेकच्या, धनादेशाच्या माध्यमातून करण्यात येतात. अनेक जण साध्या व्यवहारासाठी पण धनादेशाचा वापर करतात. रोज लाखो लोक बँकेत त्यांचे आर्थिक व्यवहार वा इतर बँकेसंबंधीच्या कामासाठी जातात. यामध्ये बँकेतील अनेक महत्वाच्या कामाचा समावेश असतो. आज भारतातील कोट्यवधीं लोकांचे बँकेत खाती (Bank Account) आहेत. जनधन योजनेने तर ग्रामीण भागातील, आदिवासी पाड्यातील लोकांना पण बँकिंगचा अधिकार दिला आहे. त्यातील उलाढाल पण वाढली आहे. त्याविषयीची आकडेवारी नुकतीच केंद्रीय अर्थखात्याने संसदेच्या पावसाळी सत्रात सादर केली. बँकिंग व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहेत. आता फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन बँकिंगमध्येच फसवणुकीची भीती (Banking Fraud) नाही तर ऑफलाईन प्रकरात पण गंडा घातल्या जाऊ शकतो. धनादेश देताना (Cheque Tips) त्यासाठीच काळजी घ्यावी लागते. ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.

Pen

बँकेचा धनादेश जेव्हा पण तुम्ही द्याल, तेव्हा त्यावर लिखापढी करण्यासाठी, त्यावर लिहिण्यासाठी तुम्हाला पेनचा वापर करावा लागेल. तुम्ही धनादेश भरण्यासाठी इतरांकडून पेन (Pen) घेऊन तो भरत असाल तर ही एक मोठी चूक होऊ शकते. कारण या पेनचा वापर फसवणुकीसाठी सुद्धा होऊ शकतो. अनेकदा आपण अनेक व्यवहार धनादेशाच्या माध्यमातून करतो. धनादेश भरताना दुसऱ्याचा चेक वापरत असाल तर फसवणूक होऊ शकते. कारण काही खास पेनची काही अक्षरे, संख्या मिटविता येतात आणि ती नव्याने टाकता येतात.

हे सुद्धा वाचा

धनादेश

त्यामुळे धनादेश भरताना इतर कोणाकडून पेन घेऊन नका. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. पेनद्वारे लिहिलेली रक्कम पुसून त्या जागी नवीन रक्कम टाकता येते. संख्या पण तशीच बदलता येते. ही हेराफेरी तुम्हाला गोत्यात आणू शकते. कारण तुमचे हस्ताक्षर ही मंडळी बदलवत नाहीत. पण धनादेशावरील रक्कम बदलून टाकता. त्यामुळे धनादेश भरताना ही चूक अजिबात करु नका.

Cancelled Cheque

एखाद्याला धनादेश द्यायचा असेल तर त्याच व्यक्तीचा पेन घेऊन धनादेशमध्ये माहिती भरु नका. चेक कॅन्सल करण्यासाठी चेकच्या बाजूला तीन तिरप्या रेषा मारा. त्यावर Cancelled Cheque असे लिहा. हे करताना सुद्धा स्वतःकडील पेनचाच वापर करा. इतर कोणाच्या ही पेनचा वापर करु नका. नाहीतर एखादी व्यक्ती या चुकीचा फायदा घेऊन तुम्हाला गंडवू शकते.