मुंबई: सध्या इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. ऑक्टोबर महिन्यात या संकटात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासून घरगुती सिलेंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दिल्ली आणि मुंबईत CNG आणि पाईप गॅसची (PNG) किंमत 10 ते 11 टक्क्यांनी वाढू शकते. ICICI Securities च्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात गॅसच्या किंमतीत जवळपास 76 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे सामान्यांचे किचन बजेट कोलम़डण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जातील.
अॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका आहे. 1 ऑक्टोबरपासून APM चा दर 3.15 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (mmBtu) इतका होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ऑक्टोबरपासून 7.4 एएमबीटीयू इतकी होईल. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
या दरवाढीमुळे एप्रिल 2022 पर्यंत CNG आणि PNG आणखी महागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील गॅसचे दर वाढल्यास ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला मोठा फायदा होईल.
गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे पेट्रोलचे दर शंभरीपार गेले होते. तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे.
संबंधित बातम्या:
जनआशीर्वाद कशासाठी? इंधन, गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की महागाई वाढवली म्हणून, जयंत पाटलांचा सवाल
नव्या वर्षात गॅसचा भाव वाढला आणि गावात पुन्हा चूलीचा धुराडा
सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका! पुन्हा वाढली LPG गॅस सिलेंडरची किंमत