Credit Card Tips: क्रेडिटकार्डचे बिल वेळेत भरणे शक्य होत नाही? मग या तीन गोष्टींनी मिळेल बँकेकडून दिलासा

| Updated on: Oct 06, 2022 | 9:58 AM

जितका सहज क्रेडिट कार्डचा वापर केला जातो तितकेच सहज त्याचे बिल भरणे शक्य होत नाही. तुम्ही देखील या समस्येला समोर जाता का?

Credit Card Tips: क्रेडिटकार्डचे बिल वेळेत भरणे शक्य होत नाही? मग या तीन गोष्टींनी मिळेल बँकेकडून दिलासा
क्रेडिट कार्ड
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  बदलत्या गरजांनुसार क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खरेदी करताना,बिल भरताना क्रेडिट कार्डचा उपयोग आपण सहज करतो मात्र त्याचे बिल भरतांना ते तितके सहजरित्या भरले जात नाही. बऱ्याचदा त्यावेळी आर्थिक ओढाताण असू असते. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डची बिल थकीत (Unbilled Amount) राहतं. नाईलाजास्तव क्रेडिटकार्डचे बिल भरले जात नाही, मात्र हे वारंवारहोणे चांगले नाही कारण यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा CIBIL स्कोर खराब होतो. यासह, तुम्ही भविष्यासाठी कर्जाचा मार्ग बंद करता. बरेच लोकं संपूर्ण बिल भरण्याच्या स्थितीत नसतील तर ते फक्त व्याजाचे पैसे देतात. काही लोक किमान पैसे भरून तात्पुरता मार्ग काढतात. मात्र जे बिलाचा एक रुपयाही भरत नाहीत त्यांचे काय?

परिणामांची जाणीव ठेवा

जर तुम्हीदेखील अशा परिस्थितीचा सामना करत असाल त्याच्या परिमनामांबद्दल नक्की विचार करा. बिल भरण्यास जितका विलंब होईल तितके विलंब शुल्क वाढेल आणि व्याजदेखील वाढेल.

क्रेडिट कार्ड बिलावरील व्याज दर वर्षी 25% पर्यंत आहे, जे तुम्हाला मोठ्या कर्जात ढकलण्यासाठी पुरेसे आहे. जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर तुम्हाला अशा काही टिप्स वापराव्या लागतील ज्यामुळे तुम्हाला बँकेकडून दिलासा मिळेल.

हे सुद्धा वाचा

किमान परतफेड करा

पहिली टीप किमान परतफेडीची आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डची पूर्ण रक्कम भरू शकत नसाल, तर किमान परतफेडीची रक्कम द्या. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होण्यापासून वाचेल. क्रेडिट स्कोअर खराब झाल्यास तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळणे कठीण होईल.

जर तुम्ही किमान परतफेड केली नाही तर तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. जर तुम्ही किमान परतफेड करू शकत नसाल, तर तुमच्या बँकेशी विनंती करून देय तारीख वाढवण्याची विनंती करा. जर तुम्ही वेळेवर बिल भरत असाल तर बँक तुमची मागणी देखील मान्य करू शकते.

शिल्लक हस्तांतरण

दुसरा उपाय म्हणजे शिल्लक हस्तांतरण. क्रेडिट कार्डची थकबाकी खूप जास्त असल्यास, ते फेडण्यासाठी काही महिने लागू शकतात. क्रेडिट कार्ड बिल धोकादायक स्थितीत पोहोचण्यापूर्वी, ते हस्तांतरित करण्याचा निर्णय घ्या. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल कमी व्याजाच्या वैयक्तिक कर्जामध्ये हस्तांतरित करू शकता.

यानंतरही तुमच्यावर कर्ज कायम राहील, परंतु यामुळे काही प्रमाणात आराम मिळेल. व्याज देखील कमी भरावे लागेल आणि बिल किंवा क्रेडिट कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिक दिवस उपलब्ध असतील.