मुंबई : सध्या लोक रोखीने खरेदी कमी करुन डिजिटल पध्दतीने पेंमेंट करणे पसंत करत आहेत. कोरोना काळात याची संख्या अधिक वाढली आहे. याचाच एक परिणाम म्हणून हल्ली ‘बाय नाऊ पे लेटर’चा ट्रेंड पूर्वीपेक्षा वेगाने पसरला आहे. छोटी खरेदी असो किंवा मोठी या विविध कार्डद्वारे त्वरित क्रेडिट (Credit) उपलब्ध होत असते. शिवाय तुम्ही क्रेडिटच्या सहाय्याने तुमचा व्यवसाय सहज चालवू शकता. बीएनपीएल कार्डचे एक वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नाही. क्रेडिट कार्ड, ईएमआय कार्ड आणि बीएनपीएल (BNPL card) यांसारखी क्रेडिट देण्यासाठी अनेक प्रकारची कार्डे बाजारात आहेत. या तिन्ही कार्ड्सचे काम जवळपास सारखेच आहे. ग्राहकांना क्रेडिट प्रदान करणे. परंतु यात काही फरक आहेत, त्यामुळे ग्राहक आपल्या सोयीनुसार या तिघांमधून कोणतेही एक कार्ड निवडतो. येथे आपण क्रेडिट कार्ड आणि बीएनपीएल कार्ड यातील मूलभूत फरक (basic difference) काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
बिल भरण्याच्या कालावधीपर्यंत कोणतेही व्याज आकारले जात नाही त्याला व्याजमुक्त क्रेडिट असे म्हटले जात असते. बीएनपीएल या बाबतीत आघाडीवर आहे. कारण 3 महिन्यांसाठी व्याजाशिवाय कर्ज देण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. दरम्यान, सर्व कंपन्या तीन महिन्यांसाठी व्याजमुक्त क्रेडिट देऊ शकत नाहीत हेही तितकेच खरे आहे. काही कंपन्यांचा हा कालावधी 15 दिवसांचाही असू शकतो. म्हणून, बीएनपीएल कार्ड घेताना, व्याजमुक्त कालावधी किती आहे? खात्री करा. क्रेडिट कार्डवर हा कालावधी 45 दिवसांचा असतो. ईएमआय कार्डवरील व्याजमुक्त कालावधी बदलतो.
क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारच्या ऑफर उपलब्ध असतात, ज्या बीएनपीएल कार्डवर नसतात. अशी काही क्रेडिट कार्डे देखील आहेत जी क्रेडिट पेमेंटमध्ये रिवॉर्ड पॉइंट्स देते. परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डवर ईएमआयचा लाभ घेत असाल तर, मात्र रिवॉर्ड पॉइंट्स किंवा ऑफरचा लाभ मिळत नाही. याशिवाय बीएनपीएलवर कॅशबॅक आणि डिस्काउंट ऑफर देण्यात येत असतात.
क्रेडिट कार्ड कधीही कुठेही वापरले जाऊ शकते. ऑनलाइन किंवा ऑफलाइन देखील यातून व्यवहार होउ शकतो. याउलट, बीएनपीएल कार्ड फक्त निवडक ठिकाणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन वापरात येउ शकते. क्रेडिट कार्ड्सच्या मोठ्या व्याप्तीमुळे त्याचा वापरकर्ता वर्ग बीएनपीएलच्या तुलनेत मोठा आहे.
इतर बातम्या
Nashik: अंत्यसंस्कारास जागा मिळेना, शेवटी ग्रामपंचायतीसमोर दिला अग्निडाग; प्रकरण काय?