‘NFT’साठी कोट्यवधींची उड्डाणे; डिजिटल अर्थव्यवहारांच्या मैदानात युवराजची एंट्री!

| Updated on: Dec 16, 2021 | 9:28 PM

बिटकॉईनपाठोपाठ नॉन-फंगीबल टोकन डिजिटल अर्थव्यवहारांत ट्रेंडिंगचा विषय बनले आहे. त्यामुळे नामांकित अभिनेते, सुप्रसिद्ध खेळाडूनंतर उद्योगजगताचे लक्ष ‘एनएफटी’कडे वेधले गेले आहे. विख्यात एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने स्वत:चे नॉन-फंगीबल टोकन (NFT) लाँच करण्याची घोषणा केली आहे.

‘NFT’साठी कोट्यवधींची उड्डाणे; डिजिटल अर्थव्यवहारांच्या मैदानात युवराजची एंट्री!
Yuvraj Singh
Follow us on

नवी दिल्ली : डिजिटल अर्थजगतात नॉन फंगीबल टोकनची (NFT) सर्वत्र चर्चा आहे. नामांकित अभिनेत्यांनी आतापर्यंत नॉन फंगीबल टोकन स्विकारण्याची घोषणा केली आहे. महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान यांच्यानंतर ‘एनएफटी’च्या यादीत आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याच्या नावाचा समावेश होणार आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवराज सिंग ‘एनएफटी’ची घोषणा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. (Cricketer Yuvraj Singh Announces launching of NFT Collection Moments)

बिटकॉईनपाठोपाठ नॉन-फंगीबल टोकन डिजिटल अर्थव्यवहारांत ट्रेंडिंगचा विषय बनले आहेत. त्यामुळे नामांकित अभिनेते, सुप्रसिद्ध खेळाडूनंतर उद्योगजगताचे लक्ष ‘एनएफटी’कडे वेधले गेले आहे. विख्यात एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने स्वत:चे नॉन-फंगीबल टोकन (NFT) लाँच करण्याची घोषणा केली आहे.

एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनी ही नॉन-फंगीबल टोकनची घोषणा करणारी भारतातील पहिली कार निर्माती कंपनी ठरली आहे. एमजी मोटर इंडियाच्या नॉन-फंगीबल टोकन (NFT) कलेक्शनची विक्री 28 डिसेंबर, 2021 पासून सुरू होणार आहे. डिजिटल क्रिएटिव्हच्या एकूण 1111 युनिटची विक्री केली जाणार आहे. डिजिटल विक्रीसाठी KoineArth च्या NgageN प्लॅटफॉर्मची निवड करण्यात आली आहे.

सेलिब्रेटींची चांदी:

भारतातील अनेक नामांकित सेलिब्रेटींनी एनएफटीला पसंती दर्शविली आहे. बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, अभिनेता रजनीकांत, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या सहित अनेक सेलिब्रेटींनी एनएफटीचं दमदार स्वागत केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात सुनील गावस्कर यांनी आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवणींचे ‘एनएफटी’ कलेक्शन लाँच केले.

‘एनएफटी’ म्हणजे काय रं भाऊ?

आभासी जगतामध्ये ‘एनएफटी’हे डिजिटल ऑब्जेक्ट म्हणून गणले जाते. यामध्ये वस्तू, संगीत, छायाचित्रे, व्हिडिओ यापैकी कशाचाही समावेश असू शकतो. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘एनएफटी’ला अधिकृततेचं प्रमाणपत्र बहाल केलं जातं. डिजिटल स्वरुपात ‘एनएफटी’ची देवाणघेवाण केली जाते. ‘एनएफटी’च्या खरेदी-विक्री व्यवहारांतून मोठ्या स्वरुपाच्या आर्थिक उलाढालीला देखील चालना मिळते. आभासी स्वरुपाच्या वस्तूंवर कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली सध्या ‘एनएफटी’च्या वर्तृळात घडत आहेत.

इतर बातम्या

Cidco Lottery | 2022 | घर घेण्याचं स्वप्न होणार साकार, सिडको स्वस्तात घर विकणार?

एसबीआयच्या ‘या’ दोन करंट अकाऊंटवर मिळतात चांगल्या सुविधा; व्यवसायिकांसाठी ऑफर्सची खैरात

Sachin tendulkar : मास्टर ब्लास्टरची नवी ‘इनिंग’; कार कंपनीत कोट्यावधींची गुंतवणूक!

(Cricketer Yuvraj Singh Announces launching of NFT Collection Moments)