Fraud : एका क्लिक आणि 3 लाखांचा गंडा, तुम्ही गुगलमध्ये हे तर सर्च करत नाही ना..

Fraud : Google मध्ये सर्च करताना तुम्ही ही चूका केल्या तर त्यांचा दंडम नक्कीच बसतो..

Fraud : एका क्लिक आणि 3 लाखांचा गंडा, तुम्ही गुगलमध्ये हे तर सर्च करत नाही ना..
एक क्लिक पडली महागात
Image Credit source: सोशल मीडिया
Updated on: Nov 09, 2022 | 4:51 PM

नवी दिल्ली : प्रत्येक दिवशी सायबर फसवणुकीचे (Cyber Fraud) एक ना एक प्रकरण देशभरातील पोलीस ठाण्यात येतेच. सायबर भामटे सावज टिपण्यासाठी अनेक आयडिया (Idea) लढवितात. आपली एक चूक आपल्याला त्यांच्या जाळ्यात ढकलते आणि आपण अलगद जाळ्यात अडकतो. त्यामुळे जागरुकपणे व्यवहार (Transaction) करणे आवश्यक आहे.

उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगरमध्ये ही घटना घडली आहे. येथील महिलेने गुगलवर एक सर्च केला. त्यानंतर तिच्या खात्यातून तब्बल 3 लाख रुपये लंपास करण्यात आले. अकाऊंट हँकर्सने या महिलेने केलेल्या एका चुकीचा तिला धडा शिकविला.

ही महिला पर्यटनाचा विचार करत होती. त्यासाठी तिने MakeMyTrip या ऑनलाईन कंपनीची सेवा घेतली. तिने हॉटेल आणि तिकीट बूक केले. पण हे बुकिंग करताना अतिरिक्त रक्कम दिल्याचे तिच्या लक्षात आले.

अतिरिक्त रक्कम रिफंड मिळावी यासाठी तिने कंपनीकडे दाद मागितली. यासाठी तिने गुगलवर एक सर्च केला आणि त्याचा फटका बसला. सायबर भामट्यांनी याचा फायदा उठवत तिला एक फिशिंग लिंक पाठवली. त्यावर क्लिक करताच तिच्या खात्यातून रक्कम वळती झाली.

त्यामुळे गुगल सर्च करताना यानंतर प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भामटे अनेक बँकांचे, कंपन्यांचे संकेतस्थळ हुबेहुब तयार करतात. त्यामुळे खरी आणि खोटी वेबसाईट चटकन लक्ष्यात येत नाही.

भामटे बँका, कंपन्यांचे कस्टमर केअर क्रमांक एडिट करतात. त्यामुळे तुम्ही कॉल केल्यावर तो भामट्यांकडे जातो. ते तुम्हाला जाळ्यात ओढतात. त्यात तुम्ही जागरुक नसाल तर भामटे त्याचा फायदा उठवितात.

त्यामुळे बँकिंग, वैयक्तिक अशी कोणतीही माहिती समोरच्याला देऊ नका. तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करुन माहिती भरतानाही सजग रहा. अनाधिकृत लिंकवर क्लिक करु नका. सावध रहा.