ग्राहक बाजारातून किंवा मॉलमधून नियमित फळे घेत असतात. त्या फळांवर विशिष्ट प्रकारचे स्टीकर लावलेले असते. सफरचंद, संत्रा यासारख्या फळांवर लावलेल्या स्टीकरचा अर्थ काय असतो? हे 100 पैकी 99 जणांना माहीत नाही. त्यामुळे प्रीमियम क्वालिटी किंवा इम्पोर्ट क्वालिटीचे फळ देत असल्याचे सांगितले जाते. परिणामी फळ विक्रेते ग्राहकांना सहज फसवू शकतात. मुंबई, पुणे असो की अन्य लहान गावे, सर्वच ठिकाणी विकल्या जाणाऱ्या सफरचंद, संत्रा यांच्यावर असे स्टीकर लावलेले असतात. या स्टीकरचा एक्सपोर्ट-इम्पोर्टशी काहीच संबंध नाही. तुमच्या आरोग्याशी संबंधित हा विषय आहे. यामुळे हा विषय माहीत असणे गरजेचे आहे. चला तर समजून घेऊ या काय आहे हा विषय…
बाजारातून घेणाऱ्या सफरचंद किंवा संत्र्यावर 4 अंकी स्टिकर दिसले तर सावध व्हा. ते खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या. या स्टिकर्सवर लिहिलेले क्रमांक 4 अंकांनी सुरू होतात, जसे की 4026 किंवा 4987. म्हणजेच स्टिकरवर चार अंक असतील आणि त्यांची सुरुवात 4 ने होत असेल, तर अशी फळे कीटकनाशके आणि रसायनांचा वापर करून तयार केलीली आहेत. हे आकडे फळांची गुणवत्ता दर्शवतात. तुम्हाला ही फळे थोडी स्वस्तात मिळू शकतात, पण ते तुमच्या आरोग्यासाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसान करणारे आहे.
फळांच्या स्टिकर्सवर 5 अंकी नंबर लिहिलेले असेल तर त्याचाही विशिष्ट अर्थ आहे. या संख्या 8 ने सुरू होतात. जर 84131 किंवा 86532 इत्यादी. फळांवर असे अंक लिहिले असतील तर याचा अर्थ फळे जेनेटिकली मोडिफाइड आहेत. म्हणजेच ही फळे नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत विकसित केली आहेत. रसायने आणि कीटकनाशके असलेल्या फळांपेक्षा त्यांची किंमत जास्त आहे. ही फळे खाणे आरोग्यासाठी काही फायदे देणारी आहेत. परंतु त्याचे काही तोटेही आहेत.
उत्तम दर्जाच्या फळांवर कोणत्या प्रकारचे स्टिकर्स लावले जातात, ते पाहू या. उत्तम दर्जाच्या फळांवर स्टिकर्सवरील संख्या 5 अंकीच आहे. परंतु त्याची सुरुवात 9 पासून सुरू होते. जसे 93435 वगैरे काहीही असू शकते. याचा अर्थ ही फळे रासायनिक आणि कीटकनाशकांशिवाय सेंद्रिय पद्धतीने तयार केली गेली आहेत. साहजिकच त्यांची किंमत इतरांपेक्षा जास्त असते. पण आरोग्याचा विचार करता,स अशी फळे उत्तम दर्जाची असतात.