तुम्ही दोन घरांचे मालक आहात का? आयकरात सूट मिळवण्यासाठी हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या

| Updated on: Sep 19, 2021 | 5:42 PM

घरगुती मालमत्तेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे स्वत:चा कब्जा असलेली मालमत्ता अर्थात त्यामध्ये तुम्ही स्वत: राहत असता आणि दुसरी म्हणजे जी मालमत्ता तुम्ही भाड्याने दिलेली असते. जर तुमच्याकडे दोन घरे किंवा सदनिका असतील तर एक निवासी आणि दुसरे भाड्याने मानले जाईल.

तुम्ही दोन घरांचे मालक आहात का? आयकरात सूट मिळवण्यासाठी हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या
तुम्ही दोन घरांचे मालक आहात का? आयकरात सूट मिळवण्यासाठी हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या
Follow us on

नवी दिल्ली : अनेक लोकांची एकापेक्षा जास्त घरे आहेत. जर तुमच्याकडे आधीच वडिलोपार्जित घर असेल आणि तुम्ही स्वत:हून घर बांधले असेल तर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त घर असू शकतात. आता घर रिकामे ठेवायचे की भाड्याने द्यायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही दुसरे घर विकत घेतले असेल किंवा खरेदी करण्याची तयारी करत असाल. तसेच तुमच्याकडे आधीच दोन घरे असतील आणि दोन्ही घरे भाड्याने देऊन जर तुम्ही दुसऱ्या शहरात स्थलांतरित होत असाल तर तुम्हाला कर नियम माहित असले पाहिजेत. भाडे आणि त्याच्या व्याजातून होणार्या कमाईवर एक वेगळा कर नियम आहे, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. (Do you own two homes, Learn these important rules to get income tax relief)

घरगुती मालमत्तेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे स्वत:चा कब्जा असलेली मालमत्ता अर्थात त्यामध्ये तुम्ही स्वत: राहत असता आणि दुसरी म्हणजे जी मालमत्ता तुम्ही भाड्याने दिलेली असते. जर तुमच्याकडे दोन घरे किंवा सदनिका असतील तर एक निवासी आणि दुसरे भाड्याने मानले जाईल. या श्रेणीच्या आधारावर तुमच्याकडून आकारण्यात येणारा कर निश्चित केला जाईल. जरी घरमालक दुसरे घर किंवा फ्लॅट भाड्याने देत नसतील आणि ते घर रिकामेच ठेवत असतील, तरीही ते घर भाड्याने अर्थात रेंटल म्हणूनच विचारात घेतले जाईल. त्यानुसारच तुम्हाला आयकर भरावा लागेल. घराच्या मालमत्तेवरील कर हा ते घर मालकाच्या ताब्यात आल्यापासूनच लागू होतो.

भाड्याने दिलेल्या घरावरील कराचा नियम

जर तुम्हाला तुमची कोणतीही मालमत्ता भाड्याने द्यायची असेल तर भाड्याचे उत्पन्न त्या वर्षीच्या आयटीआर फाईलिंगमध्ये दाखवावे लागेल. भाड्याने घेतलेल्या घरातून एका वर्षात येणाऱ्या भाड्याची रक्कम आयटीआरमध्ये दाखवावी लागेल. आयटीआरमध्ये गृहकर्जावरील व्याज आणि एका वर्षात महामंडळाला भरलेला कर सर्वकाही जोडून दाखवले जाते. साहजिकच, तुमच्या उत्पन्नात घरगुती मालमत्तेच्या उत्पन्नाचाही समावेश आहे. त्यामुळे करदेखील त्यानुसार भरावा लागेल. समजा, तुमचे एक घर रिकामे आहे आणि ते भाड्याने दिले नसेल तरीही अशा परिस्थितीत अंदाजे भाड्याची गणना करून कर आकारला जातो.

घराच्या भाड्यातून मिळणारे उत्पन्न कलम 24 अंतर्गत कर सूटसाठी पात्र आहे. यामध्ये मानक कपात, महापालिका कर, गृहकर्जाचे व्याज समाविष्ट आहे. यात दलाली किंवा कमिशन पैशांचा समावेश नाही. गृहकर्जाचे व्याज असो किंवा दुरुस्तीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज हे दोन्ही करमुक्तीच्या कक्षेत येतात. कॉर्पोरेशन टॅक्समध्ये घर टॅक्सवरील खर्च समाविष्ट आहे, जो करमुक्त आहे. मानक कपातअंतर्गत एखाद्या व्यक्तीला वार्षिक मूल्यावर अर्थात भाड्याच्या माध्यमातून वर्षभरात मिळालेल्या उत्पन्नावर 30 टक्के कपात मिळते.

दोन घरांवरील कराचा नियम

जर घरभाडे हे गृहकर्जाच्या वजावटीपेक्षा जास्त असेल, तर ती निव्वळ प्राप्त रक्कम करदात्याच्या एकूण उत्पन्नात जोडली जाते आणि त्या व्यक्तीच्या स्लॅबनुसार कर आकारला जातो. तथापि, गृह कर्जाच्या मूळ रक्कमेवर जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची सूट उपलब्ध आहे. आता तुम्ही असे गृहीत धरा की तुम्ही दोघेही घरात राहत नसाल आणि इतरत्र शिफ्ट झाला असाल व अशा परिस्थितीत तुम्ही दोन्ही घरे भाड्याने दिली आहेत. येथे तुमच्या दोन्ही घरांवरील उत्पन्न करपात्र असेल. चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही घरांच्या गृहकर्जावर भरलेल्या व्याजावर तुम्हाला कर सूटचा लाभ मिळेल. व्याजावर सूट देण्याची ही सुविधा आयकर कलम 24 अंतर्गत उपलब्ध आहे.

जर तुम्ही स्वत: दोन्ही घरात राहत असाल तर …

जर घरमालक स्वत: दोन्ही घरात राहत असेल आणि भाड्यातून कोणतेही उत्पन्न येत नसेल, तर एका मालमत्तेचे एकूण वार्षिक मूल्य शून्य मानले जाईल. दुसरे घरदेखील स्वत:च्या राहणीसाठी वापरले जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय भाड्यावर कोणताही कर लावला जाणार नाही. आयकर कलम 80 सी अंतर्गत एक करदाता गृहकर्जाच्या व्याजावर 2 लाख रुपये कपातीचा दावा करू शकतो. तसेच गृहकर्जाच्या मूळ रकमेवर 1.5 लाखांपर्यंत कपातीचा दावा केला जाऊ शकतो. हा नियम जुन्या कर नियमानुसार आहे. नवीन कर नियमानुसार गृहकर्जाच्या व्याजावरील कर कपातीचा लाभ आणि गृहकर्जाची मुख्य परतफेड उपलब्ध होणार नाही. (Do you own two homes, Learn these important rules to get income tax relief)

इतर बातम्या

सुखजिंदरसिंग रंधावा पंजाबचे नवे ‘सरदार’, मुख्यमंत्रीपदावर अखेर शिक्कामोर्तब; थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

IPL 2021: शारजाहच्या मैदानात 16 वर्षांहून कमी वयाच्या प्रेक्षकांना बंदी, प्रत्येक मैदानातील नियम वेगवेगळे