मुंबई: जर तुम्ही भविष्याची तरतूद म्हणून एखाद्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. या पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना आहे. एलआयसी सरल पेन्शन योजना हा एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे. 1 जुलैपासून ही योजना सुरु झाली आहे.
एलआयसी सरल पेन्शन स्कीमचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लाइफ अॅन्युइटी विथ 100% रिटर्न ऑफ परचेस प्राईस आणि दुसरी पेन्शन योजना म्हणजे संयुक्त जीवन. सिंगल लाईफ पॉलिसी ही एकाच व्यक्तीच्या नावावर असेल. त्यामुळे पेन्शनधारक जिवंत असेल तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. तर संयुक्त जीवन योजनेत पती-पत्नी अशा दोघांना कव्हर केले जाईल. या दोघांपैकी कोणीही शेवटपर्यंत जिवंत राहील त्याला पेन्शन मिळत राहील. दोघांचाही मृत्यू झाला तर वारसदाराला बेस प्राईसचे पैसे मिळतील.
* विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याचे पेन्शन सुरू होईल.
* आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला दरमहा किंवा तिमाहीत पेन्शन हवी आहे, अर्धवार्षिक किंवा वार्षिक. तुम्हाला हा पर्याय स्वतः निवडावा लागेल.
* ही पेन्शन योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेता येते.
* या योजनेमध्ये किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
* ही योजना 40 ते 80 वर्षांच्या लोकांसाठी आहे.
* या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर कधीही कर्ज मिळेल.
या योजनेचा भाग होण्यासाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आणि कमाल 80 वर्षे आहे. ही संपूर्ण आयुष्यासाठी पॉलिसी असल्याने, पेंशनधारी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत पेन्शन संपूर्ण आयुष्यभर मिळेल. सरल पेन्शन पॉलिसी सुरु होण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.
पेंशन केव्हा मिळणार हे पेंशन धारकालाच ठरवायचे आहे. यात तुम्हाला 4 पर्याय मिळतील. आपण दरमहा पेन्शन घेऊ शकता, दर तीन महिन्यांनी घेऊ शकता, दर 6 महिन्यांनी किंवा 12 महिन्यांत एकदा घेऊ शकता. आपण जो पर्याय निवडाल, त्या काळात आपली पेन्शन येणे सुरू होईल.
आता प्रश्न उद्भवतो की या सरल पेन्शन योजनेसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, तर हे आपल्यालाच निवडावे लागेल. म्हणजेच आपण ज्या रकमेची पेन्शन निवडाल त्यानुसार पैसे द्यावे लागतील. तुम्हाला दरमहा पेन्शन पाहिजे असल्यास किमान 1000 रुपये पेन्शन घ्यावी लागेल, तीन महिन्यांसाठी 3000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6000 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 12000 रुपये पेन्शन घ्यावी लागेल. कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही.
आपल्याला गंभीर आजार असल्यास आणि उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्यास आपण सरल पेन्शन योजनेत जमा केलेली रक्कम काढू शकता. आपल्याला गंभीर आजारांची यादी दिली आहे, ज्यासाठी आपण पैसे काढू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर बेस प्राईझच्या 95% हिस्सा रिटर्न दिला जातो. या योजनेंतर्गत (सरल पेन्शन योजना) कर्ज घेण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. योजना सुरु झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.
संबंधित बातम्या:
LIC च्या ‘या’ पॉलिसीत FD पेक्षा जास्त परतावा , मॅच्युरिटीवर 27 लाख मिळणार, एकदाच भरा प्रीमियम
एलआयसीची विशेष पॉलिसी : दररोज 25 रुपये बचत करा आणि 2 लाख मिळवा, 5 वर्ष कमी भरावा लागेल प्रीमियम