मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर शेतीपुरक उद्योगांमधून तुम्ही चांगली कमाई करू शकता. या क्षेत्रात शेतीच्या तुलनेत अधिक कमाईची हमी असते. ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून हमखास केला जाणारा व्यवसाय म्हणजे लेयर बर्ड फार्मिंग (layer bird farming business). हा व्यवसाय तुलनेत कमी जोखमीचा असून यामधून तुम्ही बक्कळ पैसेही कमावू शकता.
आरोग्याच्यादृष्टीने अंडी पोषक असल्याने वर्षातील 12 महिने त्याला मागणी असते. सप्टेंबर ते जून या काळात अंड्यांना जास्त मागणी असते. उर्वरित काळात मागणी घटली तरी अंड्यांच्या बाजारपेठेत कधीच मंदी येत नाही.
उत्पादनाच्यादृष्टीने हिशेब करायचा झाल्यास एका अंड्यासाठी सुमारे 3.50 रुपये खर्च येतो आणि ते घाऊक बाजारात 4.50 रुपयांपर्यंत विकते. म्हणजेच, तुम्हाला थेट 1 रुपयाचा फायदा होतो. जर तुम्ही 10000 कोंबड्या पाळून व्यवसाय सुरु केला तर चार महिन्यांनंतर रोज सुमारे 10 हजारांचे उत्पन्न मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही एका महिन्यात तीन लाख रुपयांपर्यंत कमावू शकता.
पिल्लापासून अंड्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेस 16 आठवडे लागतात. पण एक कोंबडी 25 आठवड्यांनंतर चांगल्या संख्येने अंडी घालू लागते. कोंबडी संपूर्ण आयुष्यात सुमारे 360 अंडी घालते. कोंबडीचे आयुष्य साधारणपणे 2-3 वर्षे असते. परंतु व्यवसायाच्यादृष्टीने विचार करायचा झाल्यास त्यांचे आयुष्य जवळपास 72 आठवडे असते.
कोंबडीच्या एका पिल्लाची किंमत साधारण 42 रुपये इतकी आहे. चांगल्या प्रतीच्या पिल्लाचे वजन 35 ग्रॅमपेक्षा जास्त असावे आणि एखाद्याने नेहमी विश्वसनीय कंपनीकडून पिल्लं खरेदी करावीत. कोंबडीचे पिल्लू चार महिन्यांचे होईपर्यंत साधारण 3 किलो धान्य खाते. त्यानंतर कोंबडी अंडी द्यायला सुरुवात करते.
कुक्कुटपालनासाठी तुम्हाला मोठ्या जागेची आवश्यकता असते. त्यानंतर कोंबडीची पिल्लं विकत घेण्यासाठी साधारण पाच ते सहा लाखांचा खर्च येतो. 1500 कोंबड्यांचे लक्ष ठेवले तर तुम्हाला 10 टक्के जास्त पिल्लं खरेदी करावी लागतील. कोंबड्यांच्या विक्रीसोबतच तुम्ही अंडी विकूनही पैसे कमवू शकता.
संबंधित बातम्या:
शेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई
सोयाबीनला विक्रमी झळाळी, क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार, उच्चांकी दराचा फायदा नेमका कुणाला?
नोकरीला रामराम करतं माढ्यातील शिरसट दाम्पत्यानं पोल्ट्री व्यवसायात करुन दाखवलं
अवघ्या 50 हजारात सुरु करा हा व्यवसाय, सरकार 35 टक्के भांडवल देणार, महिन्याला कमवाल एक लाख रुपये