प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ हा भविष्यासाठी खूप महत्वाचा असतो. निवृत्तीनंतर आपल्याला त्याचा लाभ व्हावा, यासाठी पीएफमध्ये विशिष्ट रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. कर्मचाऱ्यांची ती भविष्यासाठीची पुंजी असल्याने पीएफसंदर्भातील कोणतीही अपडेट किंवा बातमी आल्यास त्याविषयी कर्मचाऱ्यांना जाणून घ्यायला आवडतं. नव्या आर्थिक वर्ष सुरू झालं असून त्याविषयी आम्ही तुम्हाला अगदी सोप्या शब्दात समजावून सांगणार आहोत.
नव्या आर्थिक वर्षापासून पीएफच्या नियमात बदल झाले आहेत. ते बदल आम्ही तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहोत. नव्या वर्षाक आयकरासंदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना टॅक्स लागल्यास त्यात सूट मिळू शकते.
कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असणार भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफच्या नियमांत बदल झाले आहेत. भविष्य निर्वाह निधीमध्ये अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास अतिरिक्त रक्कमेवर मिळणाऱ्या व्याजाचा परतावा पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे.
पीएफच्या या नव्या नियमानुसार सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आयकरावर 1962मध्ये नंबर 9D आणला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे दोन पीएफचे खाते बनवले जाईल. त्या खात्यांपैकी एका खात्यात अडीच लाखांवरील रक्कम जमा केली जाईल.
पीएफ खातेधारकांचे दोन खाते बनवल्यास पीएफचे पहिले खाते पूर्णपणे टॅक्स फ्री होईल. तर खाते क्रमांक दोन देखील पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे. हा नियम एक एप्रिलपासून सुरू झालाय. आता या पीएफच्या खात्यांमध्ये मालकाकडून मिळणारी पीएफ रक्कम नसल्यास याची मर्यादा पाच लाख असणार आहे. त्यामुळे खाते क्रमांक एकमध्ये आपल्याला पाच लाखांपर्यंत रक्कम जमा करता येईल. तेही टॅक्स फ्री असेल.