मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यामुळे देशातील बेरोजगारी उच्चांकी पातळीला पोहोचली होती. परंतु, कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागल्यानंतर हे चित्र हळुहळू बदलताना दिसत आहे. देशात रोजगानिर्मितीने पुन्हा वेग धरला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) जून महिन्यातील आकडेवारी पाहता रोजगाराचे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. एकट्या जून महिन्यात EPFO च्या खातेधारकांमध्ये 12.83 लाखांनी वाढ झाली आहे. त्यामुळे देशाचा आर्थिक गाडा पुन्हा रुळावर येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात EPFO च्या खातेधारकांची संख्या 5.09 लाखांनी वाढली. जून महिन्यात नोंदणी झालेल्या 12.83 लाखांपैकी 8.11 लाख सदस्यांची पहिल्यांदाच ईपीएफओमध्ये नोंदणी झाली आहे. तर जून महिन्यात 4.73 लाख जणांनी ईपीएफओचे सदस्यत्व सोडले. मात्र, यापैकी अनेकांनी नव्या कंपनीत कामाला सुरुवात केली आहे.
जून महिन्यात ईपीएफओमध्ये नोंदणी झालेल्यांमध्ये 18 ते 25 वयोगटातील सदस्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यापैकी अनेकांनी आपले जुने PF खाते नव्या कंपनीत ट्रान्सफर केले आहे. नव्या सदस्यांपैकी 6.15 लाख जण 18 ते 25 वयोगटातील आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक सदस्यांची नोंदणी झाली. 12.83 लाख नव्या सदस्यांपैकी 7.78 लाख सदस्यांची नोंदणी या पाच राज्यांमध्ये झाली आहे.
> प्रथम unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा
>> लॉगिन करण्यासाठी यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
>> एक नवीन पेज दिसेल, सर्वात वर ‘मॅनेज’ वर क्लिक करा.
>> आता मार्क एक्झिटवर क्लिक करा.
>> तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट एम्प्लॉयमेंट दिसेल, तुमच्या UAN शी लिंक असलेला जुना PF खाते क्रमांक निवडा.
>> त्या खात्याशी आणि नोकरीशी संबंधित तपशील येथे दिसेल.
>> आता, नोकरी सोडण्याची तारीख आणि कारण प्रविष्ट करा. करी सोडण्याचे कारण म्हणजे सेवानिवृत्ती, अल्प सेवा.
>> ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. आता, ओटीपी प्रविष्ट करा आणि चेक बॉक्सवर क्लिक करा.
>> अपडेटवर क्लिक करा, नंतर ओके आणि तुमचे काम झाले.
इतर बातम्या:
भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तुर्भेत उभारले
इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार