EPF UAN पासवर्ड कसा रिसेट करायचा, ‘या’ 8 स्टेपमध्ये बदलण्याची प्रक्रिया समजून घ्या

| Updated on: Apr 04, 2022 | 10:31 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) लागू झाल्यापासून, EPF संबंधित अनेक कामे आता सुलभ झाली आहेत.

EPF UAN पासवर्ड कसा रिसेट करायचा, या 8 स्टेपमध्ये बदलण्याची प्रक्रिया समजून घ्या
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) लागू झाल्यापासून, EPF संबंधित अनेक कामे आता सुलभ झाली आहेत. जर तुम्हाला ईपीएफमधून पैसे काढायचे असतील, ईपीएफसाठी नॉमिनेशन करायचे असेल, पीएफमधून कर्ज घ्यायचे असेल, तर ही सर्व कामे पूर्वीपेक्षा आता खूप सोपी झाली आहेत. युनिव्हर्सल अकाउंट नंबर सुरू झाल्यामुळे त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे तो कधीच बदलणार नाही. कर्मचार्‍यांची संघटना, संस्था किंवा कंपनी बदलल्यानंतरही युनिव्हर्सल अकाउंट नंबर मात्र कायमस्वरुपी तोच राहणार आहे. यामध्ये तुमचा पासबुक नंबर दुसरा असू शकतो, मात्र UAN मुळे ईपीएफ सदस्याला अनेक सुविधा मिळात असतात आहेत. UAN हा क्रमांक EPFO ​​द्वारे तयार केला गेलेला 12 अंकी क्रमांक आहे.

EPFO च्या KYC मध्ये UAN हा क्रमांक दिल्यामुळे सदस्यांना अनेक प्रकारच्या ऑनलाईन सोयीसुविधा मिळू लागल्या आहेत. UAN च्या सहाय्याने EPF सदस्य कंपनीची मदत न घेता कोणत्याही ऑनलाईन सेवांचा लाभ मिळू शकतात. परंतु या ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी सदस्याला ईपीएफच्या सदस्य सेवा पोर्टलवर लॉग ईन करावे लागते. त्यासाठी लागणारे तुम्ही लॉगिन पासवर्ड तयार केला असेल पण तो विसरला गेला असेल, तर तुम्ही UAN लॉगिन पासवर्ड रिसेट करू शकता किंवा पासवर्डही बदलू शकता.

UAN पासवर्ड रिसेट करा

तुमचा युनिव्हर्सल खाते क्रमांक अ‍ॅक्टीव्ह असेल तर तुम्ही UAN पासवर्ड रिसेट करता येतो. जर UAN हा अॅक्टीव्ह नसेल तर तो सदस्य त्या सेवा पोर्टलवर सक्रिय केला जाऊ शकतो. तुम्ही जो UAN चा पासवर्ड देणार असाल तो 7 ते 20 शब्दांपेक्षा जास्त नसावा. त्यात किमान चार अक्षरे, दोन अंक आणि एक विशेष शब्दाची गरज आहे. 4 अक्षरांमध्ये 1 कॅपिटल आणि एक लहान अक्षर वापरणे गरजेचे आहे.

UAN पासवर्ड कसा रिसेट करायचा

  1. EPFO च्या अधिकृत वेबसाईटवरुन किंवा https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जा
  2. तुम्ही जर ‘पासवर्ड विसरला’ असाल तर या लिंकवर क्लिक करा
  3. तुमच्या स्क्रीनवर दिसणारा तुमचा UAN नंबर आणि Captcha त्यामध्ये समाविष्ट करा
  4. सांगितल्याप्रमाणे तपशीलाचा त्यामध्ये समावेश करा आणि ‘सबमिट’ बटण क्लिक करा. यानंतर (तुमच्या UAN क्रमांकाला लिंक असलेला फोन नंबर तुम्हाला दिसेल. तुम्हाला तुमचा फोन नंबर बदलायचा असल्यास, त्या बटणवर क्लिक करा आणि फोन क्रमांक समाविष्ट करा)
  5. वरील माहिती भरुन झाली की, तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, केवायसी प्रकार आणि प्राप्त झालेला क्रमांकाचा तपशील भरा
    ‘Verify’ म्हणून पर्याय आल्यानंतर त्यावर क्लिक करा
  6. वरील बटणावर क्लिक केल्यानंतर सर्व तपशील बरोबर असल्यानंतर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल

सूचना मिळाल्यानंतर सांगितलेल्या ठिकाणी तुमचा पासवर्डचा समावेश करा, त्यानंतर सबमिट हा पर्याय क्लिक करा, त्यानंतर तुमचा पासवर्ड यशस्वीरित्या बदललला गेला आहे असा मेसेज तुम्हाला मिळणार आहे.

संबंधित बातम्या 

HDFC : शेअर बाजारावर एचडीएफसीचा डंका! विलीनीकरणाच्या फायद्याचं तुम्हाला नेमका काय लाभ?

गुंतवणुकीची हीच वेळ! ज्येष्ठ नागरीक आणि ग्राहकांची चांदी; FDवर आकर्षक व्याजदर

Gold Price Rates Today : सोनं खरेदी करताय! त्यापूर्वी जाणून घ्या सोन्याचे दर, अंदाज बांधा आणि खरेदीला लागा!