नवी दिल्ली: नोकरदारांच्यादृष्टीने भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. दर महिन्याला या खात्यात नोकरदार आणि त्यांच्या कंपनीकडून ठराविक रक्कम जमा केली जाते. ही रक्कम नोकरदारांच्या उतारवयातील आधार मानला जातो. गेल्या बऱ्याच दिवसांपासून नोकरदारांच्या पीएफ खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे.
ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे समजते. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) दिवाळीपूर्वी नोकरदारांच्या खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा करेल, असा अंदाज आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी EPFO केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून परवानगी मिळण्याची वाट पाहत आहे. दिवाळीपूर्वी कधीही हे पैसे नोकरदारांच्या पीएफ खात्यात जमा होऊ शकतात.
या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी पीएफवरील वाढीव व्याजदर आणि महागाई भत्ता (DA) असा दुहेरी फायदा मिळेल. त्यामुळे आता केंद्रीय अर्थमंत्रालय हे पैसे नोकदरात आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्यासाठी हिरवा कंदील कधी दाखवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्यावर्षी देशात कोरोनाची साथ आल्यानंतर EPFO कडून पीएफ खात्यावरील व्याजदर 8.5 टक्क्यांपर्यंत घटवण्यात आला होता. हा गेल्या सात वर्षातील सर्वाधिक कमी व्याजदर ठरला होता. यापूर्वी 208-19 या आर्थिक वर्षात पीएफ खात्याचा व्याजदर 8.65 टक्के इतका होता. तर 2017-18 मध्ये हा व्याजदर 8.55 टक्के इतका होता.
तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे माहिती करुन घेणं अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन एक कॉल किंवा मेसेज करावा लागेल. आपल्या नोंदणीकृत मोबईल नंबरवरुन “EPFOHO UAN” टाईप करुन 7738299899 या नंबरवर पाठवा. ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजी आधी निवडलेली भाषा असते. याशिवाय मराठी, हिंदी, पंजाबी, तमिळ, मल्यालम, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली भाषांचा समावेश आहे.
तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये माहिती हवी असेल तर त्यासाठी नोंदणीकृत मोबाईलनंबरवरुन EPFOHO UAN टाईप करुन आपल्या भाषेतील पहिले तीन अक्षरं टाईप करा. उदाहरणार्थ मराठीत माहिती हवी असेल तर EPFOHO UAN MAR टाईप करुन 7738299899 नंबरवर पाठवा.
तुम्हाला आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन मिसकॉल देऊनही पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करता येतो. आपल्या मोबाईलवरुन 011-22901406 या नंबरवर कॉल करा. दोन रिंग वाजल्या की तुमचा फोन आपोआप कट होईल. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.
याशिवाय UMANG अॅपचा वापर करुनही प्रोविडेंट फंडाचा बॅलन्स चेक करता येतो. यासाठी तुम्हाला एम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विसवर (employee-centric services) क्लिक करावं लागतं. यानंतर व्यू पासबुकवर क्लिक करा. येथे तुमचा यूएएन नंबर आणि OTP टाकून बॅलन्स चेक करा.
इतर बातम्या:
Income Tax: तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई
घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे योजना?
आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया