नवी दिल्ली: कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ‘अटल बीमित व्याक्ती कल्याण योजनेची’ मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो. कोविड -19 साथीच्या काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.
अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेअंतर्गत, नोकरी गमावलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे जे ईएसआय योजनेअंतर्गत येतात. म्हणजेच ESI योगदान त्यांच्या मासिक पगारातून कापले जाते. योजनेअंतर्गत, बेरोजगार झाल्यानंतर, सरकारकडून जास्तीत जास्त 90 दिवस म्हणजे तीन महिने आर्थिक मदत दिली जाईल.
कोविड -19 च्या उद्रेकापासून आतापर्यंत 50 हजारापेक्षा अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कोणत्याही कारणामुळे नोकरी गमावलेल्या विमाधारकांना तीन महिन्यांसाठी 50 टक्के पगारावर बेरोजगारी भत्ता देण्याची ही योजना आहे. विमाधारक अंतिम नियोक्ताद्वारे दावा पुढे पाठवण्याऐवजी थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात दावा सादर करू शकतो आणि तो थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केला जातो. कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत दोन सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक असलेल्या ईएसआयसीच्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
श्री भूपेंद्र यादव, श्रम एवं रोजगार मंत्री, भारत सरकार की अध्यक्षता में 10.09.2021 को ईएसआईसी की 185वीं बैठक सम्पन्न हुई। श्री रामेश्वर तेली, श्रम एवं रोजगार तथा पेट्रोलियम एवं प्राकृतिक गैस राज्य मंत्री, भारत सरकार बैठक में उपाध्यक्ष के तौर पर उपस्थित रहे।#ESIC @byadavbjp pic.twitter.com/R3WZmMeI97
— ESIC #StayHome #StaySafe (@esichq) September 11, 2021
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) 185 व्या बैठकीत अटल बिमीत कल्याण कल्याण योजना जून 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ABVKY चा लाभ ज्यांनी नोकरी गमावली आहे त्यांना मिळेल.
या बैठकीत कर्नाटकातील हारहोली आणि नरसापूर येथे प्रत्येकी 100 खाटांची दोन नवीन ईएसआयसी रुग्णालये, केरळसाठी सात नवीन ईएसआयसी दवाखाने, इतर गोष्टींसह, पाच एकर जमीन संपादित करण्यास मान्यता जाहीर केली.
केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यानुसार आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 डिसेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तुर्तास नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.
संंबंधित बातम्या:
नोकरदार, मजुरांसाठी मोठी बातमी, सामाजिक सुरक्षा संहिता लवकरच लागू होणार, श्रमिकांना काय फायदा?
आपणही PF खातेधारक असाल तर ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही
UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स