मुंबई : देशात यंदा पुन्हा निवडणुकांचा बार उडणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा सहित मणिपूर या राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. तर त्यानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा क्रमांक आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरु केली आहे. भले तुम्ही या राज्यातील नसाल ही, परंतु, मतदार याद्यात तुमचे नाव आहे की नाही, याची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण काही तांत्रिक कारणामुळे तुमचे नाव यादीत कमी झाले असेल तर तुम्हाला नावाची नोंद करता येईल.
मतदारांना त्यांच्या राज्याच्या मतदार यादीत नाव शोधता येते. ही सुविधा भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांना ही सुविधा दिली आहे. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सर्वात अगोदरच तुमचे नाव, तुमचे विधानसभा मतदार क्षेत्राचे नाव, नाव आणि आडनाव, लिंग यांची माहिती द्यावी लागेल. जिल्ह्यांच्या नावाआधारे ही तुमचे नाव मतदान यादीत शोधता येईल.
तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही याची खातरजमा करु शकता. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल अथवा लॅपटॉप, संगणक असायला हवा.
आता निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जा.
www.nvsp.in या पोर्टलवर लॉग इन करा
electoralsearch वर क्लिक करा
दोन पद्धतीने तुमेच नाव सर्च करता येईल
पहिली पद्धत- तुमची संपूर्ण माहिती जमा करा
यामध्ये तुमचे वडिलांचे/ पतिचे नाव द्या. वय, लिंग, जन्मतारीख, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार क्षेत्राचे नाव द्या
दुसरी पद्धत- तुमच्या मतदान ओळखपत्रावरील क्रमांक टाका. राज्याचे नाव देऊन सर्च पर्याय निवडा
घरबसल्या मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी अशी प्रक्रिया करता येईल
सर्वात अगोदर https://www.nvsp.in/ निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर जा
नवीन मतदार रजिस्ट्रेशन ऑनलाईन अर्ज हा पर्याय निवडा
फॉर्ममध्ये माहिती नोंदवा. त्यात नाव, पत्ता, जन्मतारीख ,मोबाईल क्रमांक, ई-मेल याची माहिती काळजीपूर्वक भरा
तुम्ही दिलेल्या माहितीचा पुरावा म्हणून आधारकार्ड आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा
सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा
ई-मेल आयडीवर ओळखपत्रासंबंधीची लिंक पाठविण्यात येईल
याद्वारे ओळखपत्र तयार करण्यासंबंधीची सध्यस्थिती म्हणजे स्टेट्स पाहता येते.
एका महिन्यात मतदान ओळखपत्र तुमच्या घरच्या पत्त्यावर येईल.
अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ओळखपत्रासाठी नोंदणी करता येईल
त्यासाठी सरकारी कार्यालयात फेरी मारण्याचा आणि वेळ वाया घालविण्याचा त्रास वाचेल.
संबंधीत बातम्या :