नवी दिल्ली– फिक्स डिपॉझिट (एफडी) गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. सर्वाधिक एफडीमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. गुंतवणुकीत जोखीम घेऊ न शकणाऱ्या व्यक्तींसाठी एफडी नेहमीच सर्वोत्तम पर्याय ठरतो. दरम्यान,कमी व्याजदर आणि महागाईच्या वर्तमान परिस्थितीत एफडीत गुंतवणूक तोट्याची ठरू शकते. मात्र, ज्येष्ठ नागरिक व जोखीम पासून सुरक्षा प्राप्त करणाऱ्या व्यक्तींसाठी एफडी सर्वोत्तम पर्याय ठरतो.
कोविड प्रकोपानंतर अनेक बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फिक्स डिपॉझिट योजना सुरू केल्या. 60 वर्ष आणि अधिक वयाच्या नागरिकांना वर्तमान व्याज दरापेक्षा अधिक व्याज दिले जाते. मात्र, एकाच एफडीत सर्व पैशांची गुंतवणूक टाळावी. तुम्ही पाच लाखांसाठी एफडी करू इच्छित असल्यास एकापेक्षा अधिक बँकांत एफडी रक्कम विभाजित करा. तुम्हाला आपत्कालीन स्थितीत एक एफडी खंडित करता येईल. ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर नेमके किती व्याज दर मिळते जाणून घेऊया-
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँककडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.30 टक्के व्याज दिले जाते. लघु वित्तीय बँकात सूर्योद्य सर्वोत्तम व्याज देणारी बँक आहे. एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीत तीन वर्षात 1.24 लाख रुपयांपर्यंत वाढ होईल.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने फिक्स डिपॉझिटच्या व्याज दरात बदल केला आहे. बँकेने 2 कोटींपर्यंतच्या डिपॉझिटवरील व्याज दर 6.75-7.50 निश्चित केला आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या अधिसूचनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना 990 दिवसांच्या कालावधीसाठी 7.50 टक्के व्याजदर असणार आहे.
एयू स्मॉल फायनान्स बँकद्वारे ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीसाठी 6.75 टक्के व्याज दर दिला जातो. आरबीएल बँकद्वारे ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीसाठी 6.80 व्याज दिले जाते. येस बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज प्रदान करते.
बँकाचे व्याजदर दृष्टिक्षेपात
o सूर्योद्य बँक-7.30%
o येस बँक- 7%
o एयू बँक- 6.75%
o आरबीएल बँक-6.80%
o उज्जीवन बँक- 7.50%
फिक्स डिपॉझिटला सुरक्षा कवच
स्मॉल फायनान्स बँक आणि खासगी बँकाद्वारे अधिक व्याज दर प्रदान केले जातात. वित्तीय संस्थामधील ठेवींवर डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे (DICGC) 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर सुरक्षा कवच प्रदान केले जाते. बँकेची आर्थिक गणित बिघडल्यानंतर गुंतवणुकदारांना ठेवींची सुनिश्चिती साठी संरक्षण कवच महत्वाचे ठरते. रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित डीआयसीजीसीचे संनियंत्रण केले जाते.