नवी दिल्ली : भविष्यातील जोखीम टाळण्यासाठी, आपल्या पश्चात कुटुंबियांची ससेहोलपट थांबण्यासाठी आपण जीवन विमा पॉलिसी (Life Insurance) खरेदी करतो. तर गृह विमा, आरोग्य (Health), ट्रॅव्हल विमा काढता येतो. पण असा एक विमा आहे, जो तुम्हाला मोफत मिळतो. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना केंद्र सरकार हे विमा संरक्षण देते. नोकरदार वर्गाचे पीएफ खाते असते. त्यांना मोफत विमा मिळतो. इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम 1976 (EDLI) अंतर्गत हा विमा मिळतो. त्यासाठी पीएफ सदस्यांना कोणतेही शुल्क, हप्ता जमा करावा लागत नाही. ही योजना एकदम निःशुल्क आहे. पण त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तुम्हाला वारसदाराचे नाव पीएफ खात्यात जोडावे लागते. तरच या विम्याचा लाभ मिळतो.
ईपीएफओ हा विमा EDLI अंतर्गत देण्यात येतो. या योजनेतंर्गत सदस्याच्या वारसाला 2.5 लाख ते 7 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळते. या योजनेतंर्गत जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. भविष्य कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्याचा (Members) अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना (Heirs) आर्थिक मदत देण्यात येते. 1976 पासून ही योजना लागू आहे. त्यामुळे संकटाच्या काळात या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार मिळतो.
काय आहे योजना
EPFO सदस्यांना विम्याची सुरक्षा असते. एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance Cover) अंतर्गत विमा मिळतो. या विमा योजनेत (Employees Deposit Linked Insurance) वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळते. या योजनेसाठी सदस्याला कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. त्यासाठी तुमची कंपनी योगदान देते. त्यासाठी कर्मचाऱ्याला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
कसा करावा दावा
जर कर्मचाऱ्यांचा, सदस्याचा अचानक, अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना विम्याचे संरक्षण मिळते. ते विम्यासाठी दावा दाखल करु शकतात. त्यासाठी वारसदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे. दावा दाखल करताना मृत्यू प्रमाणपत्र, वारसा हक्कासंबंधीचे कागदपत्रे सादर करावे लागतील.
EDLI योजनेतील महत्वाचे मुद्दे