Railway Helpline: रेल्वेत तुमची बर्थ कोणी बळकवली तर फक्त असा एक मेसज करा, तुमचा प्रश्न जागेवरच सुटेल

| Updated on: Oct 14, 2024 | 6:17 PM

Railway Helpline: रेल्वेचा 139 क्रमांकावर एक मेसेज पाठवून तक्रार करु शकता. त्यानंतर टीसीला तुम्हाला शोधावे लागणार नाही. टीसी तुम्हाला शोधत तुमच्या बर्थवर येईल. त्यासाठी तुमचा पीएनआर नंबर, सीट नंबर आणि विषय असे टाईप करुन मेसेज 139 क्रमांकावर पाठवा.

Railway Helpline: रेल्वेत तुमची बर्थ कोणी बळकवली तर फक्त असा एक मेसज करा, तुमचा प्रश्न जागेवरच सुटेल
Follow us on

Railway Helpline: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. रेल्वेचा प्रवास सर्वात सुरक्षित आणि आरामदायक असतो. त्यामुळे अनेक जण प्रवास करण्यासाठी आरक्षण करुन प्रवास करतात. परंतु काही वेळा आरक्षित असलेल्या तुमच्या सीटवर दुसरा कोणीतरी बसलेला असतो. त्या व्यक्तीला सांगूनही तो जागेवरुन उठत नाही. त्यावेळी भांडण होते. मग तो व्यक्ती ऐकत नसेल तर एक पर्याय आहे. त्याच्याशी भांडण करण्यापेक्षा एक मेसज करा. तुमचा प्रश्न जागेवर सुटेल. तुम्हाला तुमच्या हक्काची बर्थ मिळेल.

काय आहे पर्याय

तुमच्या आरक्षित सीटवर कोणी बसला असेल तर पहिला पर्याय आहे. तुम्ही त्याची टीसीकडे तक्रार करा. परंतु एका टीसीकडे अनेक कोच असतात. त्यामुळे टीसी मिळत नाही. त्यामुळे रेल्वेने आणखी एक पर्याय दिला आहे. तुम्ही रेल्वेचा 139 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. किंवा रेल्वेची अधिकृत वेबसाईट https://railmadad.indianrailways.gov.in/madad वर तक्रार करा.

रेल्वेने आणखी एक पर्याय दिला आहे. तुम्ही रेल्वेचा 139 क्रमांकावर एक मेसेज पाठवून तक्रार करु शकता. त्यानंतर टीसीला तुम्हाला शोधावे लागणार नाही. टीसी तुम्हाला शोधत तुमच्या बर्थवर येईल. त्यासाठी तुमचा पीएनआर नंबर, सीट नंबर आणि विषय असे टाईप करुन मेसेज 139 क्रमांकावर पाठवा. म्हणजे
SEAT (PNR NUMBER) (SEAT NUMBER) OCCUPIED BY UNKOWN PASSENGER हा मेसेज पाठवा. तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाते.

हे सुद्धा वाचा

इतर कोणत्याही अडचणीसाठी…

रेल्वेने इतर अडचणींसाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी 58888 आणि 9200003232 या क्रमांकावर मेसेज पाठवावे लागले. तुमचा कोच खराब असले, पाणी नसेल किंवा इतर काही अडचण असल्यास आपला पीएनआर नंबर आणि मोबाईल नंबर टाकून जी सर्व्हिस हवी त्याचा मेसज टाका.

  • C – कोचच्या स्वच्छतेसाठी
  • W – पाण्यासाठी
  • P – निर्जंतुकीकरण आणि कीटक नियंत्रणासाठी
  • B – बेडरोलसाठी
  • E – ट्रेन लाइट आणि एसी साठी
  • R -किरकोळ दुरुस्तीसाठी