Gold bonds | गोल्ड बाँड तुमच्यासाठी आहे फायद्याचे; या सहा कारणांनी करू शकता गुंतवणूक

| Updated on: Jan 09, 2022 | 11:58 AM

सोमवारी सुरू होणाऱ्या बाँडची किंमत 4786 रुपये प्रति ग्राम निश्चित केली आहे. ऑनलाइन अर्जावर 50 रुपये प्रती ग्राम सूट दिली जाईल.

Gold bonds | गोल्ड बाँड तुमच्यासाठी आहे फायद्याचे; या सहा कारणांनी करू शकता गुंतवणूक
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: TV9
Follow us on

गोल्ड बाँड (Gold Bond Scheme 2021-22) मध्ये एक वेळ गुंतवणूक करण्याची संधी दिली जात आहे. योजनेची पुढची किस्त खरेदी करण्यासाठी सोमवारपासून खुली राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) बाँडची नव्या किस्तीसाठी किंमत (Gold bond issue price) 4786 रुपये प्रती ग्राम ठेवली आहे. तुम्ही योजनेत गुंतवणूक करू पाहता आणि निर्णय घेऊ शकत नसाल, तर आयसीआयसीआय बँकेने बाँडमध्ये गुंतवणुकीचे फायदे समोर ठेवले आहेत. याच्या मदतीनं तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.

गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीचे फायदे काय

आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना पाठविलेल्या इमेलमध्ये सहा कारण दिली आहेत. या कारणांनी सोन्याच्या खरेदीपेक्षा गोल्ड बाँडमधील गुंतवणूक फायदेशीर आहे.

1 ) गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक सोन्याच्या किमतीशी संबंधित आहेत. अशात सोन्याच्या किमतीतील वाढीचा फायदा मिळतो. शिवाय बाँडवर 2.5 टक्के व्याज मिळतो. 2) सोने खरेदीमध्ये लागणाऱ्या जीएसटी किंवा मेकिंग चार्जमध्ये बचत होतो. गोल्ड बाँडमध्ये फक्त सोन्याची किंमतच घेतली जाते. 3) सोन्याच्या शुद्धतेची पूर्ण गॉरंटी मिळते. तुम्हाला 24 कॅरेट सोन्याची किंमत म्यॅच्युरिटीवर मिळेल, याची शाश्वती भारत सरकार देते. 4 ) 8 वर्षांनंतर बाँडवर मिळालेल्या रकमेवर कर लागत नाही. 5) चोरी होण्याची कोणतीही भीती नाही. 6) गोल्ड बाँडला बँकेकडून कर्ज घेण्यासाठी वापर करू शकता.

किती आहे SGB ची इश्यू प्राईस
आर्थिक वर्ष इश्यू प्राईस ( रुपये प्रती 10 ग्राम)
2015-16      2733
2016-17     3055
2017-18     2932
2018-19    3184
2019-20   3779
2020-21   4928
2021-22   4800 (आतापर्यंत)

काय आहे सॉवरेल गोल्ड बाँड

रिझर्व्ह बँकेनुसार, गोल्ड बाँड सरकारी सुरक्षा आहे. याची किंमत सोन्याच्या किमतीवर आधारित आहे. गुंतवणूकदार सोन्याच्या किमतीबरोबर गुंतवणूक करतो. म्यॅच्युरिटीनंतर नगदी रक्कम मिळते. बाँडला भारत सरकारकडून रिझर्व्ह बँक जारी करते. गुंतवणूकदार कमीत-कमी 1 ग्राम आणि जास्तीत-जास्त 4 किलोपर्यंत खरेदी करू शकतो. तसेच ट्रस्ट 20 किलोपर्यंत खरेदी करू शकते. रिझर्व्ह बँकेनुसार, गुंतवणुकीवर एकच नुकसान आहे. सोन्याच्या किमतीत घट झाल्यास नुकसान होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे की गोल्ड बाँड सोमवारपासून 5 दिवस सब्सक्रिप्शनसाठी खुला राहील. म्हणजे गुंतवणूक 10 ते 14 जानेवारीपर्यंत बाँडमध्ये करता येईल. बाँड इश्यू प्राईस 4786 रुपये प्रति ग्राम तयार केले गेले

Winter Skincare Tips : हिवाळ्यात मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!

Social Mediaवर Viral झाला महागड्या मिठाईचा Video, खाण्याआधी शंभरवेळा करावा लागेल विचार

‘खेळ कोणीही सुरु करुद्या, संपवण्याचं काम माझं’, टीम इंडियातील भूमिकेबाबत वेंकटेश अय्यरचं वक्त्तव्य