मुंबई: सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असतात. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मंगळवारी डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव आज 0.12 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी, चांदीचे भाव 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,141 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. त्यामुळे सोने रेकॉर्ड पातळीपेक्षा 8059 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या भावात आज 0.12 टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे सोने 48,141 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.26 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 65,964 रुपये आहे.
सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्त राहण्याचा अंदाज नाशिकमधील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात सोन्याचा प्रतितोळा दर 51000 रुपये इतका होता. मात्र, यंदा सोन्याचा प्रतितोळा दर 47000 ते 47500 रुपये इतका असेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
इतर बातम्या:
राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांशेजारी उभारले जाणार पेट्रोल पंप, मिळणार ‘या’ खास सुविधा
Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?