Gold price: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

| Updated on: Nov 12, 2021 | 11:10 AM

Gold price | 2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज, MCX वर सोने डिसेंबर फ्युचर्स 49,091 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच सोने अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा 7109 रुपयांनी स्वस्त आहे.

Gold price: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव
Gold
Follow us on

नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असतात. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी, चांदीचे भाव 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरून 49,091 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.21 टक्क्यांनी घसरली. सध्या चांदीचा प्रतिकिलो भाव 66,825 रुपये इतका आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर

तुम्ही दररोज घरबसल्या सोन्याचा भाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही सोने आणि चांदीचे नवे दर पाहू शकता.

रेकॉर्ड स्तरापेक्षा 7100 रुपयांनी स्वस्त

2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज, MCX वर सोने डिसेंबर फ्युचर्स 49,091 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच सोने अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा 7109 रुपयांनी स्वस्त आहे.

सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढली

अनेक जाणकारांनी दसरा आणि दिवाळीच्या आसपास सोन्याचा भाव पुन्हा वधारेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज बहुतांश प्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. कारण, गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांनी ऑक्टोबरमध्ये 303 कोटींची कमाई केली. सणासुदीच्या काळात  यावर्षी सोन्याची 20 टन अधिक विक्री झाली.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या:

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना

Solar Energy: घरावर सोलर पॅनल्स लावायचेत, जाणून घ्या किती खर्च येणार?

आता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च