Gold-Silver Weekly Updates : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोन्याने केला 48 हजाराचा टप्पा पार

| Updated on: Oct 16, 2021 | 8:16 PM

या महिन्यात आतापर्यंत सराफा बाजारात सोने 1,658 रुपयांनी महाग झाले आहे. 1 ऑक्टोबर रोजी ते प्रति 10 ग्रॅम 46,467 रुपये होते, जे आता 48,125 रुपयांवर पोहोचले आहे.

Gold-Silver Weekly Updates : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोन्याने केला 48 हजाराचा टप्पा पार
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीचे दर पुन्हा चमकत आहेत. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाईटनुसार, या आठवड्यात सोने 1,159 रुपयांनी महाग होऊन प्रति 10 ग्रॅम 48,125 रुपये झाले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 46,966 रुपयांवर होता. तर सराफा बाजारात चांदी 1,915 रुपयांनी महाग होऊन 63,290 रुपये प्रति किलो झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 61,375 रुपये प्रति किलो होती. (Gold-silver price hike this week, gold crossed the 48,000 mark)

ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत सोने 1,658 रुपयांनी आणि चांदी 3,882 रुपयांनी महागली

या महिन्यात आतापर्यंत सराफा बाजारात सोने 1,658 रुपयांनी महाग झाले आहे. 1 ऑक्टोबर रोजी ते प्रति 10 ग्रॅम 46,467 रुपये होते, जे आता 48,125 रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, चांदीचे दर 1 ऑक्टोबर रोजी ते 59,408 रुपये प्रति किलो होते, जे आता 63,290 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच आतापर्यंत ऑक्टोबरमध्ये चांदी 3,882 रुपयांनी महाग झाली आहे.

सोन्याची मागणी वाढतेय

सणासुदीच्या काळात देशातील सोन्याची मागणी पुन्हा वाढली आहे. गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये 91 टन सोने आयात केले गेले. सप्टेंबर 2020 च्या तुलनेत हे 658% अधिक आहे आणि कोविड महामारी सुरू होण्यापूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2019 पेक्षा 250% जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत 20% घट आणि या वर्षी सणासुदीच्या चांगल्या मागणीमुळे सोन्याची आयात वाढली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केवळ 12 टन सोने आयात करण्यात आले होते. सप्टेंबर 2019 मध्येही केवळ 26 टन सोने आयात केले गेले. परंतु यावर्षी सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 91 टनांवर गेली.

दिवाळीपर्यंत सोने 50 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता

आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्तांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे येत्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई वाढू शकते. याशिवाय सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढेल. यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

दसऱ्याला सोन्याची रेकॉर्डब्रेक विक्री

दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीसाठी गर्दी होईल, हा सराफा व्यावसायिकांचा अंदाज बहुतांश खरा ठरला. सऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात सोन्याची खरेदी-विक्री 350 ते 400 कोटी तर मुंबईत 200 कोटींचा टप्पा गाठेल, असा विश्वास सराफा बाजाराने व्यक्त केला होता. सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी येणारा ग्राहक नाण्यांपेक्षा दागिन्यांना अधिक महत्त्व देत आहे नाण्यांच्या खरेदीचे प्रमाण 40 टक्के आहे. तर दागिन्यांच्या खरेदीचे प्रमाण 60 टक्के आहे. हॉलमार्किंगच्या दागिन्यांसह शुद्ध सोन्याची खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या बाजारात तेजी कायम राहील. बाजारात मोठी बुकिंग आहे कारण गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठा पूर्णपणे ठप्प होत्या. आता मात्र बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत, असे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले होते. (Gold-silver price hike this week, gold crossed the 48,000 mark)

इतर बातम्या

फक्त दोन रुपयांची बचत करा आणि मिळवा 36000 रुपये; केंद्र सरकारची खास योजना, जाणून घ्या सर्वकाही

‘या’ स्मॉल फायनान्स बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सर्वकाही