Gold Silver Rate Today 14 December 2024: तुम्ही सोनं खरेदीचा विचार करताय का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. लग्नसराईच्या काळात दागिने स्वस्त होणे हे एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही. जागतिक ट्रेंडच्या अनुषंगाने आज 14 डिसेंबर, शनिवारी भारतात सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली. सोन्याचे आणि चांदीचे दर पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
गुडरिटर्न्सनुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यामुळे गुंतवणूकदारांचीही पसंती आहे. दरम्यान, दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा दर 92,500 रुपये आहे. या आठवड्यात चांदी 10 डिसेंबर रोजी 4500 रुपयांनी वधारली होती. तर बुधवारी एक हजारांनी किंमती उतरल्या.
दागिन्यांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. हे सोने 91.6 टक्के शुद्ध आहे. पण अनेकदा त्यात भेसळ केली जाते आणि 89 किंवा 90 टक्के शुद्ध सोने 22 कॅरेट सोने म्हणून विकून दागिन्यांना विकले जाते. म्हणूनच दागिने खरेदी करताना त्याच्या हॉलमार्कची माहिती नक्की घ्या.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव किरकोळ घसरणीसह 2,648.5 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव किंचित घसरून 30.62 डॉलर झाला.
2024 मध्ये 20.8 टक्के परताव्यासह 79,700 रुपयांच्या विक्रमी उच्चांकासह सोने चमकले आहे. 2025 मध्ये त्यात आणखी 15 ते 18 टक्के वाढ होऊ शकते. मूलभूत आणि तांत्रिक बाबींच्या आधारे गुंतवणूकदार एकूण पोर्टफोलिओमध्ये सोन्यात 5 ते 8 टक्के आणि चांदीत 10 ते 15 टक्के अलोकेशन वेटेज वाढवू शकतात,’ असे तज्ज्ञ सांगतात.
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या माहिती करून घेण्यासाठी काय करता येईल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
भारतात सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारदर, आयात शुल्क, कर आणि चलन विनिमयातील चढ-उतार यावरून आकाराला येतात. हे घटक एकत्रितपणे देशभरातील दैनंदिन सोन्याचे दर ठरवतात.